रत्नागिरी : उमरे चांदेराई (ता. रत्नागिरी) येथे पाचजणांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. दयानंद रमाकांत चौगुले (वय ४१ रा. साठरेबांबर ) असे या मृत तरुणाचे नाव आहे. फेसबुक चॅटिंगवरून झालेल्या वादातून शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी हरचेरीतील शिवसेनेचे विभागप्रमुख व पंचायत समिती सदस्य महेंद्र झापडेकर, कुमार अशोक शिंदे, महेश अशोक शिंदे, किशोर अशोक शिंदे, प्रणय गिरीधर शिंदे या पाच जणांना अटक केली आहे. पाली येथील युवक चिन्मय रामचंद्र चौगुले हा उमरे येथील एका अल्पवयीन मुलीशी फेसबुकवरून गप्पा मारत असे. ही बाब संबंधित मुलीच्या नातेवाइकांच्या लक्षात आली. घरच्यांनी तिला याबाबत विचारल्यानंतर आपण चिन्मय चौगुले याच्याशी बोलत असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी चिन्मयला तिची व घरच्यांची माफी मागण्यासाठी घरी बोलावले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (शहर वार्ताहर)
चॅटिंगवरील वादातून तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: February 13, 2017 03:23 IST