बीड : छेडछाडीला कंटाळून पेटवून घेतलेल्या अलका दिलीप घरत (२७) या विवाहितेचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला.२० आॅक्टोबरला घरात एकटी असताना गावातील शहादेव क्षीरसागर याने मी तुला पळवून नेणार आहे, असे महिलेला धमकावले होते. दुसऱ्या दिवशी त्याने फोनवरून पुन्हा महिलेला धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या अलकाने राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. शहादेवविरुद्ध नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
छेडछाडीला कंटाळून पेटवून घेतलेल्या विवाहितेचा मृत्यू
By admin | Updated: November 5, 2016 04:26 IST