मुंबई : बडी हो के मुझे पुलिस अफसर बनना हैं. गुंडे और चोरों को पकडना हैं. गुंडो से और चोरोंसे इस देश को आझाद करना है, असे स्वप्न पाहाणा-या सात वर्षांच्या कर्करोगग्रस्त चिमुरडची ती इच्छा भोईवाडा पोलिसांनी आज पूर्ण केली. टाटा रुग्णालयात हाडाच्या कर्करोगावर उपचार घेणाऱ्या महेक विनयकुमार सिंगने इन्स्पेक्टरच्या गणवेशात शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास भोईवाडा पोलीस ठाण्याचा ताबा घेतला.पोलीस ठाण्यात नेहमीच असणारे गंभीर वातावरण शुक्रवारी दुपारी काहीसे खुलले होते. मूळची उत्तर प्रदेश येथे राहणारी महेकला हाडांचा कर्करोग असून, उपचारासाठी तिला मुंबईच्या टाटा रुग्णालयात आणावे लागते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे महेकच्या आई-बाबांना मुंबईत घर घेऊन उपचारासाठी राहणे शक्य नाही. म्हणूनच त्यांनी टिटवाळ््याला भाड्याने घर घेतले आहे. महेकला लहानपणापासूनच पोलीस दलात भरती व्हायचे होते. पण तिला झालेल्या दुर्धर आजाराने ते शक्य होईल की नाही, अशी चिंता होती. तिची ही इच्छा आज पूर्ण झाली.
कर्करुग्ण चिमुकली बनली इन्स्पेक्टर
By admin | Updated: February 14, 2015 04:36 IST