शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रक्चरल आॅडिटबाबतच संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 03:41 IST

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात तातडीने अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात तातडीने अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. अशा इमारतींत सुमारे ४० ते ४५ हजार नागरिक राहत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा नेमका आकडा प्रशासनाकडे नाही. धोकादायक इमारतींत राहणारे भाडेकरू किंवा मालकही आॅडिट करू शकतात. पण, एकूणच स्ट्रक्चरल आॅडिटच्या पारदर्शकतेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. स्ट्रक्चरल आॅडिट करण्याकडे भाडेकरूंचा फारसा कल दिसून येत नाही. अहवालात इमारत धोकादायक म्हणून जाहीर झाल्यास मालक हुसकावून लावेल, घरावरील हक्क संपुष्टात येईल, अशी भावना भाडेकरूंमध्ये असते. ज्या वेळेस भाडेकरू स्ट्रक्चरल आॅडिट करतात, तेव्हा इमारत दुरुस्त करता येते, असा शेरा येतो. पण, मालकाकडून स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यास धोकादायक असल्याचे अहवालात नमूद केले जाते. यातून मालक, महापालिका अधिकारी व स्ट्रक्चरल आॅडिटर यांच्यात साटेलोटे असल्याचा संशय भाडेकरू व्यक्त करतात. कारण, एकाच धोकादायक इमारतीचे दोन वेगवेगळे अहवाल येतात. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी थर्ड पार्टी आॅडिट करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. थर्ड पार्टीच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. दोन वेगवेगळ्या स्ट्रक्चरल अहवालांची तीन ते चार प्रकरणे आली असल्याचे आयुक्तांनी स्वत:हून मान्य केले आहे. ठाकुर्लीतील धोकादायक इमारत दुर्घटनेनंतर महापालिकेने ४२ अतिधोकादायक इमारती पाडण्याचा कृती आराखडा तयार केला. त्यापैकी केवळ दोनच इमारती पाडण्याचे काम महापालिकेने केल्याचे समोर आले आहे. भाडेकरू, मालक आणि बिल्डर यांचे हक्क अबाधित राहून धोकादायक इमारतींचा विकास केला जाईल, असे सांगण्यात आले होेते. ते प्रत्यक्षात आलेले नाही. ।मातृकृपाला कोणता न्याय : २८ जुलै २०१५ रोजी ठाकुर्लीतील मातृकृपा इमारत पडून ११ जणांचा मृत्यू झाला. इमारतीचा अर्धा भाग कोसळला. त्यानंतर, महापालिकेने उर्वरित भाग पाडण्याची कारवाई केली. एखादी धोकादायक इमारत नैसर्गिकरीत्या पडली, तर भाडेकरूंचा हक्क संपुष्टात येतो. पण, धोकादायक इमारत महापालिका किंवा मालकाने पाडल्यास धोकादायक इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूंचा हक्क अबाधित राहतो. मातृकृपा इमारतीचा अर्धा भाग नैसर्गिकरीत्या पडला, तर अर्धा भाग नंतर महापालिकेने पाडला. त्यामुळे मातृकृपाच्या भाडेकरूंना नेमका कुठला न्याय लावला जाणार, हे घटनेला वर्ष उलटून गेले तरी अद्याप स्पष्ट झालेले नाही. >एक लाखाचीच मदत मिळाली : मातृकृपा इमारतीत राहणाऱ्या रवींद्र रेडीज या तरुणाची आई सुलोचना मृत्युमुखी पडली. त्याचा एक भाऊ पानपट्टी चालवतो. रवींद्र हा रिअल इस्टेटची कामे करतो. परिस्थिती बेताचीच असल्याने रवींद्र व दीपक हे दोघेही भाऊ त्यांच्या मित्राच्या घरी राहतात. मालकाने कुठलाही लाभ दिलेला नाही. सरकारकडून बऱ्याच उशिरा एक लाखाचा धनादेश मृतांच्या कुटुंबीयांना मिळाला. त्यातून घर घेता आले नाही की, पर्यायी जागा. दिलेली मदत तुटपुंजी होती. किमान, पाच लाख रुपयांची मदत मिळणे अपेक्षित होते.>जुन्यांना काढून नवे भाडेकरू दत्तकृपा इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूंना मालकाने नोटीस बजावून डिपॉझिट देण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अनेकांनी इमारत रिकामी केली आहे. दोन भाडेकरूंची पर्यायी व्यवस्था अद्याप झालेली नसल्याने त्यांनी इमारतीतील घर अद्याप सोडलेले नाही. मात्र, रिक्त झालेल्या घरांमध्ये मालकाने दोन नवे भाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्याकडून मालक तीन ते चार हजार रुपये भाडे घेतो, असा आरोप जुन्या भाडेकरूंनी केला आहे. याबाबत, मालक रमेश जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दत्तकृपा इमारतीत भाडेकरू म्हणून राहत असलेले वकील व्ही.एम. बेंद्रे यांनी इमारतीत राहणाऱ्या नऊ भाडेकरूंच्या हक्कासाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी महापालिकेस एक निवेदन दिले आहे. प्रसंगी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेने धोकादायक व अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. त्यांनी ही प्रक्रिया प्रथम स्थगित करावी. त्यांचे पुनर्परीक्षण करावे. भाडेकरू राहत असलेली इमारत धोकादायक ठरवून ती पाडली, तर त्या भाडेकरूला तो वापरात असलेल्या जागेच्या बदल्यात तेवढीच जागा नव्या बांधकाम झालेल्या इमारतीत द्यावी, असा जीआर सरकारने नुकताच काढला आहे. या जीआरच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. त्यासाठी कोणतेही मानधन न घेता हे काम करण्याची तयारी बेंद्रे यांनी दर्शवली आहे. अन्य भाडेकरूही त्यांच्याकडे आले तर त्यांची एक संघटना तयार करून हक्कासाठी कायदेशीर लढा दिला जाईल, असे बेंद्रे यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेने एखादी इमारत धोकादायक ठरवण्यासाठी काय निकष वापरले, याचीही विचारणा बेंद्रे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे..