शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

तुटलेल्या मनांची अस्तित्वाची लढत

By admin | Updated: October 2, 2014 00:11 IST

निवडणूक पंचरंगी, लढत मात्र तिरंगी; स्पर्धेत नसूनही काँग्रेसची मते निर्णायक

संकेत गोयथळे -- गुहागर--मतदार संघात पंचरंगी निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. यामध्ये प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या तिघांमध्ये होणार असल्याने आघाडी व युती तुटलेले हे पक्ष अस्तित्वाच्या लढाईप्रमाणे एकमेकाविरोधात प्रचारात उतरले आहेत. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला किती मते पडतात, यावर राजकीय गणित बिघडू शकते.तात्या नातू यांच्यापासून गुहागर मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. विनय नातू यांनी सलग चार टर्म आमदारकी भुषविली. मतदार संघाच्या फेररचनेत खेड मतदार संघ गायब होऊन मोठा भाग गुहागर मतदार संघात आला. अस्तित्वहिन झालेल्या तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी हा मतदार संघ मागितला. यातूनच विनय नातू यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्याने सेना - भाजपच्या मतांच्या विभाजन होऊन राष्ट्रवादीचे भास्कर जाधव निवडून आले.यानंतरचे राजकीय गणितच बदलून गेले. यापूर्वी वर्षानुवर्षे भाजपचा आमदार असल्याने शिवसेनेला नगण्य समजले जायचे. रामदास कदम यांनी विनय नातूंपेक्षा १० हजार मते अधिक घेऊन येथे भाजपापेक्षा शिवसेनेचे प्राबल्य असल्याचे दाखवून दिले. यावेळीही शिवसेना हा मतदार संघ सहजासहजी सोडण्यास तयार नव्हती. अखेर युतीच तुटल्याने सर्वांनाच आपला मार्ग मोकळा झाला आहे व कोण किती बलाढ्य हे दाखविण्यासाठी अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे.युती तुटल्याने विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे प्रथम दर्शनी पारडे जड झाल्याचे दिसत आहे. कारण गतवेळी युती विभाजनामुळेच भास्कर जाधव विजयी झाले. यानंतर पराभूत झालेले रामदास कदम व विनय नातूही पहिली काही वर्षे मतदार संघात फिरकले नाहीत तर दुसऱ्या बाजूने भास्कर जाधव यांनी नगरविकास राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व कामगार मंत्री अशी पदे भूषविताना विकास कामांच्या माध्यमातून सातत्याने मतदार संघाशी संपर्क ठेवला होता. विरोधकांच्या ताब्यातील गुहागर पंचायत समिती व गुहागर नगरपंचायत ताब्यात घेऊन चढता आलेख कायम ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना या मतदार संघातून अडीच हजाराचे मताधिक्य देऊन युती असतानाही आपाणच आघाडीवर असल्याचे सिद्ध केले आहे. काँग्रेस यावेळी बरोबर नसल्याने काही प्रमाणात ही मते कमी होणार आहेत. नीलेश राणे यांनी जाधवांविरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. काँग्रेसकडून राणे समर्थक संदीप सावंत हे उमेदवार आहेत. चिपळूण वगळता संदीप सावंत गुहागर व खेड मतदार संघाशी फारसा संपर्क नाही. काँग्रेसचेही या पट्ट्यात फार मोठे प्राबल्य नाही. असे असले तरी भास्कर जाधव यांना राजकीय शत्रू मानणाऱ्या नीलेश राणे यांच्याकडून किती जोर लावला जातो यावर भास्कर जाधव याचे यश अवलंबून आहे.केंंद्र सरकारच्या कामगिरीवर भाजपचा प्रमुख प्रचार रहाणार आहे. युतीचे विभाजन झाल्याने मतामध्ये होणारी घट लक्षात घेऊन प्रमुखपणे मोदी इफेक्ट व भास्कर जाधव यांच्या आक्रमक शैलीमुळे दुखावलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ते व भाजपाला सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा भाजपाच्या लाटेमध्ये घेणे याचे आव्हान विनय नातूंसमोर असणार आहे. शिवसेनेचेही येथे प्राबल्य असले तरी येथे अनंत गीते व रामदास कदम असे दोन गट आहेत. विजयकुमार भोसले हे या मतदार संघासाठी नवखे उमेदवार आहेत. अशा स्थितीत गटतट विसरुन शिवसेना कार्यकर्ते कशाप्रकारे काम करतात यावर शिवसेनेची मते कायम रहाणार आहेत. यावेळी मनसे निवडणूक रिंगणात नसल्याने शिवसेनेच्या विजयकुमार भोसले फायदा होईल, असे मानले जात आहे. गतवेळी मनसेच्या वैभव खेडेकर यांना या मतदार संघातून आठ हजार मते पडली होती. ही मते शिवसेनेकडे आकृष्ट होऊ शकतात. बसपा पक्षाचे येथे राजकीय अस्तित्व नाही तरीही वैयक्तिक संपर्कावर चार ते पाच हजार मते घेण्यास सुरेश पवार यशस्वी झाले तर इतर पक्षांचे नुकसान होऊ शकते.गुहागरएकूण मतदार २,२८,५७२नाव पक्षभास्कर जाधवराष्ट्रवादीडॉ. विनय नातूभाजपसंदीप सावंतकाँग्रेससुरेश गमरेबसपाविजयकुमार भोसलेशिवसेना