तलासरी : पोलीस ठाण्यासमोर महामार्गावर बुधवारी एका आदिवासी तरुणाने आत्महत्या केली. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात दोन भाजपच्या कार्यकर्त्यांसह चौघांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.प्रेमप्रकरणातून आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीने अनकीर येथील रमेश लहानू शिंगडा या आदिवासी तरुणाने महामार्गावर वाहनाखाली झोकून देवून आत्महत्या केली. याबाबत मुलाच्या घरच्यांनी व मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या नेत्यांनी दबाव आणल्याने भाजपाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण वरखंडे, माजी अध्यक्ष पास्कल धनारे तसेच रमेश खुताडे, मोहिनी खुताडे यांच्यावर रमेश शिंगडा तसेच राजेश खुताडे, मोहिनी खुताडे यांच्यावर रमेश शिंगडा याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करण्यात आल्याने गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. (वार्ताहर)
तलासरीत भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: May 17, 2014 22:00 IST