रावेर (जि. जळगाव) : माजी मंत्री एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर ‘प्रोशेस इश्यू’ जारी करण्याचे आदेश देऊन त्यांना ८ मे रोजी हजर राहण्याचे आदेश रावेर न्यायालयाने दिले आहेत.खडसे यांच्याविरुद्ध पुरावे न देता खोटे आरोप करून त्यांच्यासह भाजपाची बदनामी केल्याप्रकरणी भाजपाचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी दमानिया यांच्याविरुद्ध २८ जून २०१६ रोजी फौजदारी अर्ज दाखल केला होता. (प्रतिनिधी)
दमानियांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
By admin | Updated: April 8, 2017 05:01 IST