शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

गजराजामुळे नागरिक सैराट

By admin | Updated: September 8, 2016 01:30 IST

वेळ सकाळी दहाची... भोसरी बसस्थानकाजवळ कामावर जाणाऱ्या नोकरदार, चाकरमान्यांची सुरू होती धावपळ, जो तो होता घाई गडबडीत.

भोसरी : वेळ सकाळी दहाची... भोसरी बसस्थानकाजवळ कामावर जाणाऱ्या नोकरदार, चाकरमान्यांची सुरू होती धावपळ, जो तो होता घाई गडबडीत. अशातच आरोळी उठली... हत्ती सुटला... हत्ती सुटला... अन् साऱ्यांच्या नजरा वळल्या रॅम्बो सर्कशीच्या दिशेने. सर्कशीतील एका बिथरलेल्या हत्तीने मोकळ्या मैदानात घातलेला गोंधळ, सैरभैर झालेला हत्ती पाहून नागरिकांच्या काळजात झालं धस्स! होय, हे चित्रपटातील दृश्य नव्हे, तर ही आहे सत्य घटना. येथील सर्वे क्रमांक १च्या मैदानात रॅम्बो सर्कससाठी आणलेला हत्ती बिथरल्याने एकच गोंधळ उडाला होता. बुधवारी सकाळी दहाला माहुताच्या हातातून हत्ती निसटून मैदानात पळू लागल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. भोसरी नाट्यगृहासमोर असणाऱ्या या मोकळ्या मैदानात रेम्बो सर्कशीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या महिन्यात सर्कस येथील खेळ संपवून कर्नाटकात गेली आहे. तेव्हापासून तीन मोठे व एक छोटा हत्ती येथे उभारलेल्या तंबूत एका जागेवर ठेवण्यात आले आहेत. महिनाभरापासून हत्ती तंबूतच आहे. परवानगी नसल्याने त्याला बाहेर काढता व इतरत्र हलविता आले नाही. बुधवारी अचानक या हत्तीला आंघोळीसाठी बाहेर काढल्यावर माहूतावर बिथरून दोर तोडून मोकळ्या जागेत धावू लागला. चार तास हत्तीने एकच गोंधळ घातला. गर्दीला पांगविण्यासाठी भोसरी पोलिसांचा १२ जणांचा फौजफ ाटा काम करीत होता़ सकाळी ११ ते सव्वाएकपर्यंत हत्तीने मैदानावर धुमाकूळ घातला़ दुपारी दीडच्या सुमारास हत्तीने आपला मोर्चा रस्त्यावर वळविला़ हत्ती मैदानातून उड्डाणपुलाच्या दिशेने जोरात पळत गेला़ हत्तीला काबूत आणण्यासाठी माहूत आणि त्याच्या सहकाऱ्यांची मोठी कसरत सुरू होती़ या वेळी बिथरलेल्या हत्ती अनेक वेळा सैरावैर पळत होता. बिथरलेल्या हत्तीला पाहण्यासाठी उड्डाणपुलावर वाहने थांबवत होती. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडीही झाली होती. हत्ती भोसरी उड्डाणपुलाखालून पुन्हा मैदानात आणण्यासाठी भोसरीचे सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी जिद्दीने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बिथरलेल्या हत्तीला पुन्हा मोकळ्या मैदानावर हुसकावत आणले़ अखेर माहुतांनी हत्तीच्या मागच्या डाव्या पायात धारदार बरचा फेकून मारला़ तो पायात घुसल्याने बिथरलेला हत्ती जागेवरच बसला आणि त्याला काबूत आणण्यास यश मिळाले़ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सकाळी ११च्या सुमारास माहिती मिळाली असतानाही ते घटनास्थळी दाखल झाले नाहीत. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ़ सतीश गोरे हे सतत त्यांच्या संपर्कात होते़जंगली प्राण्यांना सर्कशीमध्ये वापरण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे येथील हत्ती दोन महिने सर्कस सुरू असतानासुद्धा एका जागेवर तंबूत होते. तसेच आता ही सर्कस कर्नाटकात गेली आहे. (वार्ताहर)इंजेक्शनसाठी तीन तास?सकाळी ११ला वन विभागाला कळवूनदेखील दोन वाजले, तरी कोणीच पोहोचले नाहीत. जुन्नरवरून निघाले आहेत एवढीच चर्चा होती. मात्र, कोणीच फिरकले नाही. माहुताला यश आले अन् हत्ती शांत झाला. हत्ती शांत झाला नसता व काही दुर्घटना घडली असती, तर जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.बघ्यांची गर्दी हत्ती बिथरल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली अन् भोसरीतील नाट्यगृहाजवळ गर्दी वाढू लागली. हत्ती पिसाळला अशी सगळीकडे चर्चा सुरू होती. अनेक दिवस एका जागेवर असल्याने हत्ती बिथरला होता. मात्र, नागरिकांमध्ये चर्चेला एकच उधाण आले होते. मैदानाच्या चारही बाजूंना नागरिक गर्दी करीत होते. वन विभागाचे कोणी फिरकले नाही बिथरलेल्या हत्तीची चर्चा होताच अनेक सुजाण नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले; पण वन विभागाची नसल्याने हत्तीला काबूत आणणे कठीण जात होते. माहूत आणि हत्तींना सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच हत्तीला हळूहळू शांत केले अन् नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. हत्ती हलविण्यास टाळाटाळ : लांडगे सर्कस संपल्यानंतर हत्तीला ताबडतोब येथून हलवा. या ठिकाणी नागरीवस्ती आहे. शेजारी सहल केंद्र आहे. मुले व नागरिक या ठिकाणी फिरत असतात, असे कळविले होते. मात्र सर्कसचालक महिन्यापासून गायब आहेत. लवकर हत्ती बाहेर नेले नाही, तर काही तरी घडेल अशी भीती नगरसेवक अ‍ॅड. लांडगे यांनी व्यक्त केली.