शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

५ वर्षांत २०० कोटींचा अक्षरश: चुराडा

By admin | Updated: August 1, 2016 03:33 IST

पावसाळा आला की, साथीच्या आजारांच्या बातम्या येतात. तसेच खड्ड्यांची छायाचित्रे आणि बातम्यांनी रकानेच्या रकाने भरले जातात.

- सदानंद नाईक पावसाळा आला की, साथीच्या आजारांच्या बातम्या येतात. तसेच खड्ड्यांची छायाचित्रे आणि बातम्यांनी रकानेच्या रकाने भरले जातात. दरवर्षीचे हे चित्र असते. पण, यात कुठलाही बदल होत नाही. विरोधक भ्रष्टाचाराचा आरोप करतात. सत्ताधारी ते फेटाळत चौकशीचे आश्वासन देतात. पुढे काय होेते, हे कुणालाही कळत नाही. यात सामान्यजन मात्र भरडले जातात. त्यांच्या करांच्या पैशांची उधळपट्टी केली जाते. शिवाय, त्यांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. अन्य शहरांप्रमाणे उल्हासनगरात वेगळी परिस्थिती नाही. शहराच्या या विद्रुपीकरणाला पालिका अधिकारी, नगरसेवक आणि कंत्राटदार यांची अभद्र युतीच कारणीभूत आहे. त्यांना शहराच्या विकासाशी काहीही देणेघेणे नसते. उल्हासनगर पालिकेने पाच वर्षांत रस्ते दुरुस्तीवर २०० कोटी खर्च केले. पण, रस्त्यांची चाळण काही थांबलेली नाही. खड्ड्यांत रस्ते की रस्त्यांत खड्डे... असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. पालिका रस्तादुरुस्ती, पुनर्बांधणीसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात ३५ ते ४० कोटींची तरतूद करते. त्यापैकी खड्डे भरण्यासाठी ५ ते ६ कोटी खर्च केले जातात. मात्र, दुरुस्तीनंतर महिनाभरात रस्त्यांची स्थिती जैसे थे होते. नवीन रस्त्यांच्या बांधणीनंतर थर्ड पार्टी आॅडिट होत नसल्याने निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात नेमलेले सल्लागारही नेहमीचेच असल्याने सर्व कामे संगनमताने केली जातात. वास्तविक, विरोधी पक्ष याविरोधात आवाज उठवण्याऐवजी आपल्या परिसरातील रस्त्यांसाठी निधी कसा मिळेल, याचाच सातत्याने विचार करत असतात.>माफक अपेक्षांनाही हरताळपालिकेने किमान मूलभूत सुविधा व्यवस्थित द्याव्यात, एवढी माफक अपेक्षा नागरिकांची असते. पण, नेमका याचाच विसर प्रशासनाला होतो. आपण सामान्यांच्या सेवेसाठी नाहीतर कंत्राटदारांकरिता आहोत, हे त्यांना व्यवस्थित ठाऊक असते. त्यातूनच भ्रष्टाचाराला सुुरुवात होते आणि शहराला बकालपणा येऊ लागतो.>महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतांपैकी एलबीटीचे उत्पन्न बंद झाले. त्या बदल्यात सरकारकडून मिळालेला निधी अपुरा आहे. तसेच अधिकाऱ्यांची संख्या कमी असून सरकार प्रतिनियुक्तीवर अधिकारी देत नाही. त्यामुळे पालिकेचा गाडा प्रभारी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून हाकावा लागत आहे. या सर्वांचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाने आपली भूमिका अचूक वठ्रवल्यास विकासकामाला वेग येईल. - मनोहर हिरे पालिका आयुक्त उल्हासनगर >10 वर्षांत 450 ते ५०० कोटी रुपये खर्च करूनही रस्त्याची परिस्थिती सुधारलेली नाही. अनेक रस्त्यांची दुरुस्ती कोट्यवधींच्या निधीतून वर्षातून दोन वेळा करण्याची वेळ पालिकेवर येते. निकृष्ट बांधकाम करणाऱ्या एकाही कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची हिंमत पालिकेने दाखवली नाही. रस्तेबांधणीची कामे या क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या कंपन्यांकडे जात असल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाते. यातूनच निकृष्ट दर्जाचे काम केले जाते. आणि सरतेशेवटी याचा सर्वाधिक त्रास केवळ आणि केवळ नागरिकांनाच होतो.कलानींच्या काळातील रस्ते मजबूततत्कालीन नगराध्यक्ष पप्पू कलानी यांनी शहरातील रस्ते काँक्रिटीकरणास सुरुवात केल्यानंतर राज्यातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. कालांतराने मजबूत व टिकाऊ असा ‘उल्हासनगर पॅटर्न’ मुंबईसह राज्यातील इतर शहरांनी राबवला. १९८० ते ९२ दरम्यान गोलमैदान रस्ता, नेहरू चौक ते उल्हानगर पोलीस ठाणे, मुख्य बाजारातील रस्ते, कल्याण-अंबरनाथ महामार्गाच्या रस्त्यासह अनेक मुख्य रस्ते बांधले. कलानींच्या सत्ताकाळात बांधलेल्या बहुतांश रस्त्यांची स्थिती आजही चांगली आहे. मात्र, १९९२ नंतर बांधलेल्या काँॅक्रिटच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तेच ते रस्ते आलटूनपालटून बांधण्यात येत आहेत.