शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

राज्य आपत्ती निवारण निधीत आता केंद्राचा वाटा ९० टक्के

By admin | Updated: March 8, 2015 02:40 IST

राज्यांच्या आपत्ती निवारण निधीतील (स्टेट डिझस्टर रिलिफ फंड) सहभागाचे सूत्र चौदाव्या वित्त आयोगाने बदलले असून यापुढे या निधीत केंद्र सरकारचा वाटा ९० टक्के व राज्यांचा वाटा १० टक्के असणार आहे.

अजित गोगटे - मुंबईराज्यांच्या आपत्ती निवारण निधीतील (स्टेट डिझस्टर रिलिफ फंड) सहभागाचे सूत्र चौदाव्या वित्त आयोगाने बदलले असून यापुढे या निधीत केंद्र सरकारचा वाटा ९० टक्के व राज्यांचा वाटा १० टक्के असणार आहे. परिणामी आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला आपत्ती निवारण निधीसाठी केंद्राकडून एकूण ७,३७६ कोटी रुपये मिळणार आहेत.आधीच्या आयोगांनी स्वीकारलेली पद्धत आणि गेल्या पाच वर्षांत आपत्ती निवारण कामांसाठी करावा लागलेला खर्च विचारात घेऊन आयोगाने देशातील सर्व राज्यांसाठी मिळून आपत्ती निवारण निधीसाठी ६१,२१९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी महाराष्ट्राचा आगामी पाच वर्षांसाठीचा वाटा ८,१९५ कोटी रुपयांचा असेल. त्यात ७,३७६ कोटी रुपये केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून मिळतील व बाकीची ८२० कोटी रुपयांची रक्कम राज्याला घालावी लागेल.सध्या काही ठराविक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींसाठीच या निधीतून खर्च करण्याची तरतूद आहे. अनेक राज्यांनी यात वीज कोसळणे, सर्पदंश,समुद्र किंवा नदीमुळे जमिनीची धूप होणे, दरडी कोसळणे, ढगफुटी, बांबूला फुलोरा येणे इत्यादी आपत्तीकारक घटनांचा समावेश करण्याचा आग्रह धरला होता. परंतु नानाविध प्रकारची नैसर्गिक स्थिती असलेल्या भारतासारख्या देशात सर्वत्र लागू होईल असे आपत्तीचे असे कोणतेही स्वरूप आधीच ठरविणे कठीण असल्याने आयोगाने आपत्तींची सध्याची यादी विस्तारण्याची कोणतीही शिफारस केली नाही. मात्र राज्यसापेक्ष आपत्तीची परिस्थिती हाताळण्यात लवचकिता असावी यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीतील १० टक्क्यांपर्यंत रक्कम, यादीत नसलेल्या परंतु राज्याला गरजेचे वाटेल अशा आपत्तीसाठी खर्च करण्याची राज्यांना मुभा असावी, असे आयोगाने सुचविले आहे. मात्र राज्यांनी आपल्यादृष्टीने राज्यसापेक्ष आपत्ती आधीच अधिसूचित कराव्यात व त्यासाठी निधी वापराचे निकषही ठरवावेत, असे आयोगाने म्हटले आहे.सध्याच्या व्यवस्थेनुसार काही निवडक वस्तूंवर आकारला जाणारा अधिभार हाच आपत्ती निवारण निधीसाठी पैसे उभे करण्याचा एकमेव मार्ग आहे. परंतु हे अधिभार कालांतराने बंद झाले किंवा वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यावर त्यात सामावून घेतले गेले तर हा मार्ग ही बंद होईल. त्यामुळे सरकारने या निधीसाठी पैसे उभे करण्याचा खात्रीशीर पर्यायी मार्ग शोधावा, असे आयोगाने सुचविले आहे.याच अनुषंगाने आयोगाने असेही म्हटले आहे की, सामान्य लोक व उद्योग विश्वालाही या निधीमध्ये सहभागी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपन्यांच्या मान्यताप्राप्त ‘सीएसआर’ कामांमध्ये आपत्ती निवारण निधीला दिलेल्या देणग्यांचा समावेश करणे आणि पंतप्रधान मदत निधीप्रमाणे या निधीवरही प्राप्तिकरात सूट देणे, या उपायांवर सरकारने सक्रियतेने विचार करावा.राज्य आपत्ती निधीतील केंद्र, राज्य सरकारचा वाटावर्षकेंद्र सरकार राज्य सरकार२०१५-१६ १,३३५ कोटी १४८ कोटी२०१६-१७ १,४०२ कोटी१५६ कोटी२०१७-१८ १,४७२कोटी१६४ कोटी२०१८-१९ १,५४५ कोटी १७२ कोटी२०१९-२०१,६२२ कोटी १८० कोटी