उरण : समुद्र किनाऱ्यावर राहणारे नागरिक, मच्छीमारांनी सतर्क राहून संशयितांच्या हालचाली आणि कोणत्याही अनुचित घटनेची माहिती तत्काळ सुरक्षा यंत्रणेला कळविण्यात यावी, असे सयुक्तिक आवाहन पोलीस, नौदल, ओएनजीसी अधिकाऱ्यांनी उरणवासीयांना केले आहे.अतिरेकी कारवाया आणि घातपात घडविण्यासाठी येणारे अतिरेकी, दहशतवादी समुद्रामार्गे येण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणेला वाटू लागली आहे. स्वातंत्र्यदिन आणि उत्सवकाळात देशभरात घातपाताचा धोका सुरक्षा यंत्रणेने व्यक्त केला आहे. यामुळे देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उरण येथे ओएनजीसी, नौदल आणि पोलीस यांनी सयुक्तिक बैठकीचे आयोजन केले होते. उरण पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीसाठी उरण पोलीस ठाण्याचे वपोनि राजेंद्र आव्हाड, नौदल अधिकारी गौरीशंकर मिश्रा, तुषार भाल्क, ओएनजीसीचे वैभव म्हात्रे, स्वप्निल ठाकूर, मच्छीमार, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य नागरिक यावेळी उपस्थित होते.
सागरी सुरक्षेसाठी सतर्क राहण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 02:41 IST