शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पुस्तकविक्रीतून शाळांचा ‘गोरखधंदा’

By admin | Updated: April 28, 2016 00:40 IST

एका बाजूला दप्तराचे ओझे कमी करण्याची चर्चा होत असताना विविध प्रकाशनांकडून विद्यार्थ्यांच्या माथी वेगवेगळी पुस्तके मारली जात आहेत.

नम्रता फडणीस, सुनील राऊत,

पुणे-एका बाजूला दप्तराचे ओझे कमी करण्याची चर्चा होत असताना विविध प्रकाशनांकडून विद्यार्थ्यांच्या माथी वेगवेगळी पुस्तके मारली जात आहेत. हमखास विक्रीसाठी प्रकाशनांकडून शाळांनाही टक्केवारी दिली जात असल्याचे धक्कादायक पुरावे ‘लोकमत’च्या हाती लागले आहेत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात खासगी शाळांचे पेव फुटले आहे. मात्र, अनेक शाळांकडून मुलांकडे विद्यार्थी म्हणून न पाहता एक ग्राहक म्हणून पाहिले जात आहे. शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या नावाखाली शाळांकडून अभ्याक्रमापलीकडील शैक्षणिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती घालून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. त्यासाठी विविध प्रकाशने आणि शाळांमध्ये आर्थिक हितसंबध निर्माण झाले आहेत. त्याचा फटका थेट पालकांच्या खिशाला बसत आहे. ही टक्केवारी नेमकी आहे कशी, कमिशन कसे ठरते, तसेच ही यंत्रणानेमकी चालते कशी, याचा आढावा ‘लोकमत’ने घेतला असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.शाळांना पुस्तके विक्री करणाऱ्या सहा प्रमुख कंपन्या आहेत. या कंपन्यांनी शहरात आपले अधिकृत विक्रेते नेमले असून, शहरात सर्वेक्षण करण्यासाठी टीमही नेमण्यात आलेल्या आहेत. जूनपासून डिसेंबरपर्यंत शाळांचे सर्वेक्षण करतात. त्यानंतर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत हे कर्मचारी शाळांना प्रत्यक्ष भेट देतात. पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमास पूरक असलेल्या तब्बल ३०० ते ४०० पुस्तकांची यादी देतात. या यादीतील कोणतीही पुस्तके शाळा निवडू शकते. शाळेला ‘सॅँपल कॉपी नॉट फॉर सेल’ असे स्टिकर चिटकविलेली पुस्तके देण्यात येतात. ही पुस्तके अभ्यासक्रमांसाठी बंधनकारक नसतात. शाळांनी पुस्तके निवडल्यानंतर कंपनी संबंधित विक्रेत्याकडे पुस्तकखरेदीची मागणी देते. त्यानुसार शाळांनी पुस्तके खरेदी केल्यास त्यांना एकूण बिलाच्या रकमेवर २५ टक्के कमिशन दिले जाते. विक्रेत्यांनी शाळेतच स्टॉल लावल्यास एकूण विक्रीतून जमा झालेल्या रकमेतून २५ टक्के रक्कम शाळेला देणगी म्हणून दिली जाते.>गणवेशावर घेतले जाते १०० रुपये कमिशन ४शाळांकडून मुलांना गणवेश घेण्यासाठी काही ठराविक दुकानांचेच बंधन घातले जाते.४काही ठिकाणी तर शाळांमध्येच गणवेश देण्याचे बंधन घालण्यात येते. त्यामागेही कमिशनचे गणित आहे. ४५०० रुपयांच्या आत गणवेशाची किंमत असल्यास सरसकट प्रतिगणवेशामागे शाळेला १०० रुपयांचे कमिशन दिले जाते. एक हजार रुपयांच्या पुढे गणवेश असल्यास २५० रुपयांचे कमिशन ठरलेले आहे. >शाळांकडून उडवाउडवीची उत्तरेपुस्तके का परत घेत आहेत? अशी विचारणा पालकांकडून शाळेच्या प्रशासनाकडे करण्यात आली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. मुलांची उजळणी व्हावी, प्रोजेक्ट पेस्टिंगसाठी त्यांचा उपयोग होतो, असे सांगण्यात आले. मात्र ही पुस्तके आम्ही विकत घेतली आहेत; मग शाळांना का परत करायची? असा सवाल उपस्थित करीत या पुस्तकांची अर्धी किंमत शाळांनी परत करायला पाहिजे, असे एका त्रस्त पालकाने सांगितले. >दप्तराचे ओझे कमी होणार तरी कसे? एकीकडे शासन दप्तरांचे ओझे कमी करण्याचे फतवे काढते; पण दुसरीकडे मात्र खासगी शाळांमध्ये अगदी नर्सरीपासून ते दहावीपर्यंत विषयांच्या तीन तीन पुस्तकांचे ओझे मुलांना वाहावे लागते, हा विरोधाभासच म्हणावा लागेल. एक काळ असा होता, की इंग्रजी, विज्ञान, गणित या विषयांसाठी एकच पुस्तक अभ्यासक्रमांना लावले जायचे; परंतु आता पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात वेगळ्या वह्या व तीन विषयांची तीन वेगळी पुस्तके मुलांना दिली जात आहेत. एवढ्या वह्या आणि पुस्तकांचे दप्तर घेऊन मुलांना पाठीची दुखणी बळावत आहेत, याची खासगी शाळांना चिंतादेखील नाही. केवळ पैसा कमावण्याच्या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे.>किमतींवर नाही कुणाचेच नियंत्रण?विशिष्ट कंपनीच्या पुस्तकांच्या किमतींचे लेबल काढून शाळेच्या प्रशासनाकडून चढ्या दराने पुस्तकांची विक्री केली जात आहे. या किमतींवर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून आले आहे. पालकांना त्या पुस्तकांची मूळ किंमत काय, हेच माहीत नसल्याने अजाणतेपणाने जादा दराने पुस्तक खरेदी करण्याची वेळ पालकांवर येत असून, शाळांची मात्र ’चांदीच’ होत आहे.