पंकज राऊत,
बोईसर- बोईसर एस. टी. डेपोत तळे की तळयात डेपो? प्रवाशांची डोकेदुखी, सुविधांकडे दुर्लक्ष या मथळयाखाली लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द होताच एस. टी. च्या अधिकाऱ्यांनी जेसीबी लावून सफाई केल्याने पाणी वाहून गेले.पावसाच्या पाण्याचा निचरा डेपोमधून व्यवस्थित होत नसल्याने एका भागात पाणी साचून त्याला अक्षरश: तळयाचे रूप आले होते. तर या साचलेल्या पाण्याजवळच गोसालीया इमारतीतून मोठया प्रमाणात कचरा टाकण्यात येत होता. तो नियमित उचलला जात नसल्याने तेथे गुर-ढोरांचा वावर वाढून तो कचरा व दुर्गंधीयुक्त पाण्यातून प्रवाशांना मार्गक्रमण करावे लागत होते.लोकतमधील वृत्ताची दखल घेऊन जेसीबीच्या सहाय्याने सफाई केली असली तरी ग्रामपंचायतीने ड्रेनेज लाईनचे चोक अप काढून त्याची रुंदी वाढविणे गरजेचे आहे तरच डेपोमध्ये पाणी साठणार नाही. झालेली स्वच्छता पाहून प्रवाशांनी व एसटीच्या कर्मचाऱ्यांनीदेखील लोकमतला धन्यवाद दिले.