ठाणे- महिलेची हत्या करून तिचा मृतदेह ड्रममध्ये कोंबून किसननगर नंबर तीन येथे फेकण्यात आल्याची घटना शुक्रवारी सांयकाळी निदर्शनास आली. त्या महिलेची ओळख अद्यापही पटली नाही. ठाणे महानगर पालिक ा शाळा २३ जवळ एक ड्रम कोणीतरी टाकून गेले होते. हा ड्रम कोणाचा म्हणून स्थानिकांमध्ये चर्चा सुरु असतानाच सायंकाळी तो उघडल्यावर हा प्रकार समोर आला.याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.(प्रतिनिधी)
ड्रममध्ये सापडला महिलेचा मृतदेह
By admin | Updated: May 10, 2014 20:59 IST