शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधतेचा वारसा ‘ग्लोरी आॅफ आलापल्ली’

By admin | Updated: February 13, 2017 03:59 IST

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली-भामरागड मार्गावरील ‘ग्लोरी आॅफ आलापल्ली’ आजही पर्यटकांना खुणावतो.

गजानन चोपडे / नागपूरमहाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली-भामरागड मार्गावरील ‘ग्लोरी आॅफ आलापल्ली’ आजही पर्यटकांना खुणावतो. राज्यातील जैवविविधतेचा वारसा म्हणून नावारूपास आलेले हे साग वृक्षाचे प्रचंड वन आहे.१९५३ मध्ये आलापल्लीपासून १८ किमीवर या सागवानी वनवैभवाची निर्मिती करण्यात आली. ६ हेक्टरचे हे राखीव वनक्षेत्र असून यात करस्री, तेंदू, साग व बेल वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. यात ४०० वर्षांहून अधिक वयोमानचे सागवृक्ष अद्यापही ताठ उभे आहेत. याला लागूनच मिरकल वनतलाव असून हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देणारे देशी-विदेशी पर्यटक आवर्जून या स्थळाला भेट देतात. कर्नाटक राज्याने २००७ साली पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करून आघाडी घेतली होती. त्या पाठोपाठ २०१४ मध्ये ‘ग्लोरी आॅफ आलापल्ली’ला वारसास्थळ घोषित करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत त्यात नवीन जैवविविधतेची भर पडली नसली, तरी अलीकडे जळगाव जिल्ह्यातील लांडोरखोरी व रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास आणि आंजर्ला अशा तीन ते चार ठिकाणांचे प्रस्ताव महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडे प्राप्त झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.विलास बर्डेकर यांनी दिली. यातील वेळास व आंजर्ला ही गावे सागरी कासवांसाठी प्रसिद्ध असून या गावांत ‘होम स्टे टुरिझम’ चा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आल्याचेही डॉ. बर्डेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.