शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

जामीन मंजूर होऊनही भुजबळांचा मुक्काम तुरूंगातच

By admin | Updated: June 22, 2016 18:58 IST

महाराष्ट्र सदन आणि कलिना विद्यापीठ लायब्ररी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना एसीबीच्या विशेष कोर्टाकडून जामीन मंजूर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - महाराष्ट्र सदन आणि कलिना विद्यापीठ लायब्ररी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना एसीबीच्या विशेष कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने (ACB) ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर भुजबळांची जामीनावर सुटका केली आहे. मात्र जामीन मंजूर होऊनही भुजबळ यांचा मुक्काम तुरूंगातच असणार आहे, कारण न्यायालयाने त्यांना महाराष्ट्र सदन व कलिना लायब्ररीप्रकरणी जामीन मंजूर केला असला बेहिशेबी संपत्तीप्रकरणी त्यांना जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे भुजबळांना तुरूंगातच रहावे लागणार आहे.
 आणखी वाचा : 
( छगन भुजबळ यांना अटक)
(छगन भुजबळांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी)
  •  
 
  •  
 
(छगन भुजबळांच्या 'रुग्णालय'वारीवरून चौकशीचे आदेश)
  •  
 

Bail granted to Chhagan Bhujbal & Sameer Bhujbal by the ACB court on bond of Rs 50,000 in Maharashtra Sadan and Kalina land allotment case.— ANI (@ANI_news) June 22, 2016

महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली होती. १४ मार्चला ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती. ते उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती देऊ न शकल्याने आणि चौकशीमध्ये सहकार्य करीत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

- भुजबळ यांना त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रक्कम कुठून आली असे ईडीतर्फे विचारण्यात आले. मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये हा पैसा गुंतविण्यात आला, असा आरोप आहे. रोख रक्कम रुग्णवाहिकांमध्ये ठेवण्यात आली होती. नंतर ती मटक्याच्या धंद्यातील हवाला आॅपरेटरकडे नेण्यात आली, कोलकात्याच्या कंपन्या आणि हवाला व्यवहार करणाऱ्याने आपापली भूमिका मान्य केल्यानंतरही हा पैसा कुठून आला हे समीर व पंकज सांगू शकलेले नाहीत. हा पैसा आला कुठून हे शोधून काढण्यासाठी आम्ही चौकशी करीत आहोत, असे सूत्रांनी म्हटले.

 

- भुजबळ यांनी हवाला आॅपरेटरला यात ओढले का आणि ज्या बनावट कंपन्यांनी धनादेश दिले त्यांच्याशी या आॅपरेटरने मध्यस्थी केली का याची आम्ही खातरजमा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. समीर आणि पंकज यांना असे व्यवहार मार्गदर्शनाशिवाय व भुजबळ यांच्याकडील पैशांशिवाय करणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. समीर आणि पंकज यांच्या कोणत्याही कंपन्यांमध्ये भुजबळ संचालक नव्हते. महाराष्ट्र सदन आणि कालिना सेंट्रल लायब्ररीच्या बांधकामाचे कंत्राट देण्यासाठी छगन भुजबळ यांनी कंत्राटदाराकडून लाच म्हणून ही रक्कम घेतल्याचा आरोप आहे.

 

भुजबळ कुटुंबावर झालेली कारवाई

१२ डिसें.२०१५ : ईडीकडून प्राइम डेव्हलपर्सची चौकशी

२२ डिसेंबर : ईडीकडून वांद्रा येथील खुला भूखंड व सांताक्रुझमधील नऊ मजली इमारत, अशी ११० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

१३ जानेवारी : भुजबळ यांना क्लीन चिट नाही - मुख्यमंत्री

२८ जानेवारी : भुजबळांसह कुुटुंबीयांवर महिन्याभरात आरोपपत्र, एसीबीची हायकोर्टाला माहिती

१ फेब्रु.२०१६ : छगन भुजबळ अमेरिकेला रवाना. भुजबळ यांच्याशी संबंधित ९ मालमत्तांवर ईडीचे छापे. समीर भुजबळची ईडीकडून दिवसभर चौकशी. समीर यांना रात्री उशिरा अटक.

२ फेब्रुवारी : भुजबळांवरील कारवाई सूडबुद्धीने - शरद पवारांचा आरोप

२४ फेब्रु. : भुजबळांवर आरोपपत्र दाखल

१४ मार्च : छगन भुजबळ यांना अटक