शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

लेखक, संशोधक प्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन

By admin | Updated: April 21, 2017 03:02 IST

दलित चळवळीतील आघाडीचे लेखक-संशोधक व नाटककार प्रा. डॉ. रामनाथ चव्हाण (वय ६५) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.

पुणे : दलित चळवळीतील आघाडीचे लेखक-संशोधक व नाटककार प्रा. डॉ. रामनाथ चव्हाण (वय ६५) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी शीला, मुले सागर व समीर असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. प्रा. चव्हाण यांची प्रकृती कर्करोगामुळे खालावली होती. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. मराठीतील महत्त्वाचा दस्तावेज...‘भटक्या-विमुक्तांची जातपंचायत’चा पहिला खंड २००२मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी डवरी, गोसावी, कंजारभाट, वैदू, कोल्हाटी, जोशी, डोंबारी, कैकाडी, वडारी, वंजारा, काकर, पारधी अशा ११ जमातींवर लिखाण केले आहे.२००४मध्ये प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या खंडात मातंग गारुडी, काशी कापडी, सिकलीकर, रजपूत भामटा, दसनाम गोसावी, गोपाळ, टकारी, घिसाडी, छप्परबंद अशा नऊ जमातीवर तर २००६मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या खंडात नंदीबैलवाले, गाढवगोती बेलदार, रायरंद, मरीआईवाला, बहुरूपी, नाथपंथी रावळ या सहा जमातींवर लिखाण केले आहे. २००८मध्ये प्रसिद्ध झालेल्या चौथ्या खंडात परदेशी भोई, मदारी, मसणजोगी, चित्रकथी, पाथरवट, घ्यारे कंजर, डक्कलवार अशा सात जमातीचा अभ्यास समाविष्ट असून अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पाचव्या खंडात दरवेशी, लोहार, तिरमल, बागडी, वेडूवाघरी, धनगर, गोंधळी, ओतारी आदी जमातीवर केलेला अभ्यास समाविष्ट आहे.‘भटक्या-विमुक्तांची जातपंचायत’ हे पाच खंडात प्रसिद्ध झालेले लिखाण मराठीतील हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. भटक्या विमुक्तांचे अंतरंग, पारध, बिनचेहऱ्याची माणसं, गावगाडा : काल आणि आज, घाणेरीची फुलं, जगण्यासाठी, निळी पहाट, पुन्हा साक्षिपुरम्, वेदनेच्या वाटेवरून, दलितांचा राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही त्यांची महत्त्वाची पुस्तके प्रसिद्ध आहेत. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्या सहा पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.प्रा. चव्हाण यांनी आपल्या साहित्यातून ठामपणे भूमिका मांडली. भटकणाऱ्या समाजाच्या वेदना साहित्यातून समाजासमोर मांडला. साहित्याच्या माध्यमातून ते कायमच आपल्याबरोबर असतील. - रामदास आठवले (केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय)लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनावर कार्यरत असताना त्यांनी गावागावांत जाऊन साहित्याच्या माध्यमातून भूमिका मांडली. त्यांनी बहुमूल्यलेखन केले. त्यांनी विद्यापीठात दिलेले योगदान न विसरण्याजोगे आहे. - डॉ. वासुदेव गाडे (कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)