अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ अंतर्गत अकोला जिल्ह्यात ७ हजार ८५३ शिक्षक मतदार असून, मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामात यादीतील अपात्र आणि मयत मतदारांची नावे कमी करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे.अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २० जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या अकोला जिल्ह्यातील शिक्षक मतदार यादीनुसार जिल्ह्यात ७ हजार ८५३ शिक्षक मतदार आहेत. दरम्यान, शिक्षक मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू असून, त्यामध्ये मतदार यादीतील मयत आणि अपात्र नावे शिक्षक मतदार यादीतून वगळण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ अंतर्गत जिल्ह्यातील शिक्षक मतदारांची अद्ययावत यादी लवकरच जाहीर होणार आहे.
** असे आहेत मतदार!अकोला शहर ३२२३, अकोला ग्रामीण ४५४, बार्शीटाकळी ५२१, आकोट ११३६, तेल्हारा ४८८, बाळापूर ७३४, पातूर ५१९ , मूर्तिजापूर ६९२, एकूण ७८५३