शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदरच्या आदिवासीपाड्यांत दूषित पाणी

By admin | Updated: April 4, 2017 04:18 IST

आदिवासीपाड्यांना ठाणे महापालिका स्थापन होऊन ३१ वर्षांचा कालावधी लोटला, तरीही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे

नामदेव पाषाणकर,घोडबंदर- ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना घोडबंदर परिसरातील देवीचापाडा, पानखंडा, पाचवड, नागलाबंदर, टकारडा या आदिवासीपाड्यांना ठाणे महापालिका स्थापन होऊन ३१ वर्षांचा कालावधी लोटला, तरीही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वेळेवर टँकर मिळत नसल्याने बोअरवेलचे दूषित पाणी पिण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही.आदिवासीपाडे घोडबंदरच्या मुख्य रस्त्यापासून तीन ते चार किमी अंतरावर आहेत. पाड्यांच्या काही फुटांच्या अंतरावर मोठी गृहसंकुले आणि बंगले आहेत. त्यांना पाणी मिळते, तर काही जागी टँकरचा पाणीपुरवठा सुरू आहे. पूर्वी या पाड्यांच्या शेजारून वाहणाऱ्या जिवंत झऱ्यांना पाणी यायचे. तेच पाणी पिऊन आदिवासी जीवन जगत होते. मात्र, काही वर्षांत जवळच उभ्या राहिलेल्या गृहसंकुलांत खोदलेल्या बोअरवेलमुळे या झऱ्यांचे जलस्रोत बंद झाले. वनजमिनीचे कारण सांगून आदिवासीपाड्यांना वीज, पाणी, पायवाटा नाकारण्यात येतात. टकारडा येथे दूरवर पाणी देण्यात आले,मात्रबाकीच्या पाड्यांना टँकरने पाणी दिले जात आहे.हे टँकर अनेकदा वेळेवर येत नसल्याने हातपंपाचे पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही. पानखंडा येथील शाळेतील मुलांनादेखील हातपंपाचेच पाणी प्यावे लागत आहे.याबाबत, तेथील शिक्षकांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्या शाळेची बोअरवेल अडीचशे फूट खोल आहे आणि आरोग्य विभागाने पाणीतपासणी केली असून पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. दुसरीकडे पाड्यात असलेल्या अन्य तीन बोअरवेलची स्थिती नेमकी उलटी आहे. त्यापैकी एक बंद आहे, तर अन्य दोन बोअरवेलचे पाणी कपडे, धुणीभांडी आणि पिण्यासाठी वापरले जाते. १० ते १५दिवसांतून टँकर येत असल्याने बोअरवेलचे पाणी पिण्याशिवाय येथील रहिवाशांना पर्याय नाही. सकाळच्या सुमारास थोडेसे व्यवस्थित पाणी मिळते. नंतर, येणारे पाणी गढूळ असते. हे पाणी घरात ठेवल्यावर काही वेळातच लालसर बनते. शिवाय, हे पाणी दुर्गंधीयुक्त आहे. नाइलाजास्तव ते प्यावे लागते. या पाण्याने कावीळ होते, पोटाचे दुखणे जडते, अशा तक्र ारी आहेत.जीव जगवायचा, तर हे पाणी प्यायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रि या ज्येष्ठ महिला विसुरी उंबरखांडे या महिलेने दिली. तुम्हाला पाणी मिळत नाही, तर तुम्ही तक्र ार का करत नाही, असे विचारले असता महिलांनी सांगितले की, याबाबत कोणास तक्र ार करायची तेच आम्हाला माहीत नाही. जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून ३०१ कोटींची पाणीयोजना घोडबंदरसाठी तयार करण्यात आली होती.>पाणीप्रश्न सुटणार तरी कधी? : येथील प्रस्तावित पाणीयोजनेसाठी निधी मिळाला नसल्याने आता अमृत योजनेतून निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.तसेच प्रशासनदेखील योजनेला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. साकेतवरून सव्वाचार मीटर रु ंदीची पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. हे काम होऊन पाणी वितरण व्यवस्था सुधारली तरच घोडबंदरचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.