औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत औरंगाबाद जिल्ह्णातील शेंद्रा ते बिडकीन पट्ट्यात उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीसाठी ८०० कोटी रुपये खर्चाच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी जाहीर केले.मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी येथे वंदे मातरम् सभागृह आणि हज हाऊसच्या कामाचा कोनशिला समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री बाळासाहेब थोरात होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नसीम खान, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्यमंत्री फौजिया खान आदींची प्रमुख उपस्थिती होती.मराठवाड्याच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, औरंगाबाद शहर वेगाने वाढत आहे. (प्रतिनिधी)
डीएमआयसीसाठी ८०० कोटींची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना
By admin | Updated: July 18, 2014 02:25 IST