शहरं
Join us  
Trending Stories
1
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
2
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
3
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
4
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
5
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
6
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
7
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
8
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो
9
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
10
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
11
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
12
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
13
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
14
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
15
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
16
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
17
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
18
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
19
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
20
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

एकाच झाडावर जतन केले ५१ प्रकारचे आंबे

By admin | Updated: May 11, 2014 22:48 IST

अवलिया सिव्हील इंजिनिअरची अफलातून कामगिरी

वाशिम: आखाती देशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून वाशिम जिल्‘ात ील आपल्या मूळ गावी आधुनिक शेती करण्याची कास धरत एक सिव्हील इंजिनिअर आंबाच्या एकाच झाडावर १३५० कलमे करत तब्बल ५१ प्रकारची आंब्याची फळे जपण्यात यशस्वी ठरला आहे. शेती करण्यासाठी नाके मुरडणार्‍या शेतकर्‍यांच्या मुलासाठी ही चांगलीच चपराक ठरली आहे. अंगात मुळातच काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या वाशिममधील रवि माधवराव मारशेटवार या सिव्हील इंजिनिअरने सल्तनत ऑफ ओमानमध्ये नोकरी सोडून ओसाड माळावर आंब्याची बाग फुलविली आहे. सुरुवातीला त्याने माळरानावर दोन हेक्टर पडिक शेत विकत घेतले. नंतर तो माळ जेसीबीने सपाट करुन तेथे धरणातील काळया मातीचा गाळ आणून टाकला. तेथे एक हेक्टरमध्ये आंब्याच्या विविध जातीची एक हजार झाडे लावली. त्या झाडांवर दुर्मीळ होत असलेली आंब्यांची कलमे लावली. आज त्यांची ही बाग विविध जातीच्या दुर्मीळ आम्रवृक्षांची बँक बनली आहे. ती पाहण्यासाठी तेथे राज्यभरातून शेतकरी येतात.रवि मारशेटवाराची आमराई विविध जातीच्या शेकडो आंब्यांनी लदबदून गेली आहे. या बागेत हापूस, केशर, दशेरी, आम्रपाली, दुधपेढा, मल्लिका, मंजिरी, हुर, काळाखोबरा, कलेक्टर, महाराजा ऑस्ट्रेलियन केन्ट, सिंगणवाडी, बाबोली पुनासा, साखरगोटी, कागदी हापूस, वनराज, बारमासी, केळ्या, शेप्या, सिंधू, पसर्‍या ,रॉयल स्पेशल व पि›म बंगालचा हिमसागर यासह विविध गावरानी जातीचे आम्रवृक्ष आहेत. या वृक्षांना ५० ग्रामपासून ते दोन किलो वजनापर्यंतचे आंबे लागलेले आहेत. त्यांनी बहुतांश आम्रवृक्षांवर गावरानी व अन्य जातीच्या उत्तम चवीच्या दुर्मीळ आंब्यांच्या फांद्या कलम केल्याने एकाच झाडाला विविध जातीचे, विविध रंगाचे, विविध आकाराचे आंबे लागले आहेत. त्यांची ही आमराई भेट देणार्‍यांसाठी डोळयांचे पारणे फेडत आहे. त्यांच्या बागेतील एका वृक्षावर तब्बल ५१ दुर्मीळ जातीच्या आम्र्रवृक्षाच्या १३५० फांद्या कलम केल्या आहेत. या वृक्षाला विविध जातीच्या आंब्याची विविध आकाराची पाने व फळे लागल्याचे पाहावयास मिळते. त्यांनी या बागेच्या माध्यमातून विविध जातीच्या, रंगाच्या, सुगंधाच्या व चवीच्या गावरान आंब्याचे जतन केले आहे. या बोगच्या माध्यमातून पुढील पिढीला वनस्पतीविषयक जैवविविधता जपण्याचे कार्य रवि मारशेटवार यांनी केले आहे. ते यासोबत परिसरातील शेतकर्‍यांना शेतीविषयक मोफत मार्गदर्शन करतात. त्यासाठी शासनाच्या अनुदानाविना शेतकर्‍यांच्या कृषिसहली आयोजित करुन अत्याधुनिक तांत्रिक शेती करण्यास प्रोत्साहन देतात. तसेच नेत्रदान चळवळीचेही कार्य करतात.