शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

४९ कर्मचाऱ्यांना अखेर घरे सोडावी लागणार

By admin | Updated: February 7, 2016 02:21 IST

२५ वर्षांहून अधिक काळ राहात असलेली बँकेने दिलेली कांदिवली येथील समता नगरमधील घरे सोडावी लागू नयेत यासाठी सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या ४९ कर्मचाऱ्यांनी गेली आठ वर्षे दिलेल्या

मुंबई : २५ वर्षांहून अधिक काळ राहात असलेली बँकेने दिलेली कांदिवली येथील समता नगरमधील घरे सोडावी लागू नयेत यासाठी सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या ४९ कर्मचाऱ्यांनी गेली आठ वर्षे दिलेल्या न्यायालयीन लढ्यास अपयश आले असून या कर्मचाऱ्यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत घरे खाली करून बँकेस परत करावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.ही घरे खाली करून घेण्यासाठी बँकेने कर्मचाऱ्यांविरुद्ध २००७ मध्ये ‘पब्लिक प्रिमायसेस इव्हिक्शन अ‍ॅक्ट’नुसार कारवाई सुरु केली. त्याविरुद्ध सुरेश नारायण कदम यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी बँकेचे इस्टेट मॅनेजर, अपिली अधिकारी व उच्च न्यायालयात दाद मागितली. परंतु या सर्व ठिकाणी त्यांना अपयश आले. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी केलेली विशेष अनुमती याचिकाही सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. मदन लोकूर व न्या. आर. के. अगरवाल यांच्या खंडपीठाने शुक्रवारी फेटाळली. कर्मचाऱ्यांना एवढाच दिलासा मिळाला की, बँकेने त्यांच्याकडून दंडवसुली करण्याचा बँकेने काढलेला आदेश रद्द केला गेला. ‘म्हाडा’ने समता नगर, कांदिवली येथे बांधलेल्या प्रत्येकी २० सदनिकांच्या १० इमारती सेंट्रल बँकेने आॅगस्ट १९८२ मध्ये घेतल्या. बँकेचे मुख्यालय, मुंबई विभागीय कार्यालय आणि मुंबई महागर क्षेत्रिय कार्यालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ही घरे ‘क्वार्टर्स’ म्हणून देण्याचे बँकेने ठरविले. १९९२ मध्ये ‘म्हाडा’ने या इमारतींखालील जमीनही बँकेला ९० वर्षांच्या भाडेपट्टयाने दिली. जुन्या व जीर्ण झालेल्या या सर्व इमारती पाडून तेथे नव्या इमारती बांधण्याची योजना बँकेने आखली व १९९७ पासून कर्मचाऱ्यांना तेथे घरे देणे बंद केले. २००७ मध्ये बँकेने घरे खाली करण्याची नोटीस दिली तेव्हा तेथे ४९ कर्मचाऱ्यांची कुटुंबे राहात होती व इतर घरे रिकामी होती.ही कुटुंबे सर्व १० इमारतींमध्ये विखुरलेली होती. त्यामुळे बँकेची पुनर्विकास योजना रखडली. यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयातही तडजोडीचे प्रयत्न झाले. पण त्यास यश आले नाही. या कुटुंबांनी दोन इमारतींमध्ये स्थलांतरित व्हावे व इतर इमारती पाडून पुनर्विकास काम सुरु करावे, असा एक प्रस्ताव होता. दुसऱ्या प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांनी पर्यायी जागेत राहायला जावे व बँकेने त्यासाठी त्यांना भाड्यापोटी पैसे द्यावे, असेही प्रयत्न झाले. (विशेष प्रतिनिधी)दोन्ही मुद्दे फेटाळलेबँकेनेच आम्हाला ही घरे ‘क्वार्टर्स’ म्हणून दिलेली असल्याने बँक सक्तीने घरे खाली करून घेऊ शकत नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. परंतु न्यायालयाने म्हटले की, मुळात सेवाशर्तींचा भाग म्हणून कर्मचारी या घरांवर कायमचा हक्क सांगू शकत नाहीत.‘म्हाडा’ने तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी या इमारती बँकेला दिल्या होत्या. मात्र आता बँक आम्हाला घराबाहेर काढून तेथे अधिकाऱ्यांसाठी प्रशस्त घरे बांधू पाहात आहे. हा घरे व जमीनवाटप कराराचा भंग आहे, असा कर्मचाऱ्यांचा दुसरा मुद्दा होता. तो फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, ‘म्हाडा’शी झालेल्या कराराशी कर्मचाऱ्यांचा काही संबंध नाही. अटींचा भंग होणे अथवा न होणे हा बँक व म्हाडा यांच्यातील विषय आहे.