शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

नाशिकमध्ये दीड लाख क्विंटल कांद्याचा साठा

By admin | Updated: August 23, 2015 00:33 IST

व्यापाऱ्यांनी साठा करुन कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार, निबंधक व बाजार समितीच्या सचिवांनी

नाशिक : व्यापाऱ्यांनी साठा करुन कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार, निबंधक व बाजार समितीच्या सचिवांनी संयुक्तपणे कांदा साठ्याची माहिती घेतली. जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडे सुमारे दीड लाख क्विंटल कांदा विविध गोदामात साठविल्याचे आढळले.राज्य सरकारने शुक्रवारीच जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन कांदा साठ्याची माहिती मागविली होती. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी सर्व तहसीलदारांना शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रत्येक बाजार समितीत नोंदणीकृत असलेल्या कांदा व्यापाऱ्यांच्या साठवणूक केंद्रावर जाऊन साठ्याची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुके वगळता अन्य आठ तालुक्यांमध्ये तहसीलदार, तालुका निबंधक व बाजार समितीच्या सचिवांमार्फत सकाळपासून व्यापाऱ्यांच्या गोदामांवर जाऊन माहिती घेण्यात आली. त्यात निफाड तालुक्यात सर्वाधिक कांद्याची साठवण आढळून आली. निफाडला ६१ हजार २८८ क्व्ािंटल व त्याखालोखाल बागलाण तालुक्यात २४ हजार ३५५ क्किंटल कांदा साठा असल्याचे आढळले. येवला - १५,०३४, मालेगाव - ३,७०३, कळवण - ८,७३८, सिन्नर - ६,४९०, देवळा - १५,१५० व चांदवड - ३,४५९ क्विंटल, असा एकूण एक लाख, ३८ हजार २१७ क्विंटल कांद्याचा साठा आढळल्याची माहिती पुरवठा खात्याने दिली. (प्रतिनिधी)कांद्याच्या भाववाढीवर निर्यात मूल्यवाढीची मलमपट्टीमागणीच्या तुलनेत पुरवठ्यात मोठी घट झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या कडाडलेल्या भावाने केंद्र सरकारची चिंता वाढविली आहे. निर्यातीवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी कांद्याचे किमान निर्यात मूल्य प्रति टन २७५ डॉलरने वाढवून ७०० डॉलर करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक वाढण्यासाठी कांद्याचे किमान निर्यात मूल्य प्रति टन ४२५ डॉलरवरून ७०० डॉलर करण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारने १० हजार टन कांदा आयात करण्याचे ठरविले असून २७ आॅगस्टला त्याच्या निविदा उघडल्या जाणार आहेत. घाऊक बाजारात कांद्याचे दर ५५ रुपयांच्या वर गेले असून किरकोळ बाजारात तर कांदा ८० रुपये किलोने खरेदी करावा लागत आहे. २६ जूनला केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य प्रति क्विंटल २५० डॉलरवरुन ४२५ डॉलर केले होते. मात्र त्यानंतरही कांद्याचे दर नियंत्रणात आलेले नाहीत. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव २४ आॅगस्टला नाफेड व कृषी व्यापाराशी संबंधित इतर सरकारी संस्थांकडून कांद्याच्या साठ्याचा आढावा घेणार आहेत. २०१३-१४ मध्ये १९४.०२ लाख टन उत्पन्नाच्या तुलनेत २०१४-१५ मध्ये कांद्याचे उत्पादन ४.७९ लाख टनाने घसरून १८९.२३ लाख टन झाले आहे. तर गेल्या वर्षीच्या १३.५८ लाख टन निर्यातीच्या तुलनेत २०१४-१५ मध्ये घसरण होऊन ती १०.८६ लाख टन झाली आहे.