हरभ-याच्या बनीमला आग, सव्वा दोन लाखांचे नुकसान
लातूर - बाभळगाव शिवारात चार एकर शेतातील हरभरा पिकाच्या बनीमला आग लावण्यात आली. या आगीत हरभ-याचे १ लाख ५० हजाराचे तर शेतात कापुन ठेवलेल्या बनीमचे ८० हजाराचे नुकसान झाले. याबाबत लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी उद्धव किसनराव देशमुख रा.बाभळगाव यांचे गट नंबर २११ मधील ४ एकर शेतातील हरभ-याचे पिक काढून बनीम लावून ठेवण्यात आले होते. तसेच त्यांच्या भावाचे गट १६१ मधील अडीच एकर शेतातील ज्वारी कापुन कणसाची बनीम लावून ठेवण्यात आली होती. अज्ञाताने या बनीमला आग लावली. या आगीत हरभ-याचे १ लाख ५० हजार तर ज्वारीचे ८० हजार असे एकूण २ लाख ३० हजारांचे नुकसान झाले आहे. याबाबत उद्धव देशमुख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार पाठक करीत आहेत.