पळशीतील देवीदासराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्रामविकास पॅनेलने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यात वॉर्ड १ मधून वर्षा भंडारे, मीरा जाधव, वॉर्ड २ मध्ये दशरथ जाधव, अंजली जाधव, वॉर्ड ३ मध्ये गंगाधर शिंदे, वंदना पुरी हे विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचा देवीदासराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विजयासाठी दगडूसाहेब जाधव, उद्धवराव जाधव, चंद्रकांत जाधव, बब्रुवान शिंदे, भास्कर शिंदे, श्रीहरी जाधव, काकासाहेब जाधव, रमेश गायकवाड, भारत जाधव, राजाभाऊ जाधव, नामदेव कदम, दिगंबर जाधव, श्रीमंत जाधव, धनेश्वर शिंदे, सिद्धेश्वर जाधव, बाळासाहेब जाधव, गुणवंत कदम, मुरली कदम, सटवा कदम, श्रीनिवास जाधव, दीपक जाधव, रामराव ढमाले, हणमंतराव जाधव, पांडुरंग जाधव, काकासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
पळशी ग्रामपंचायतीत आदर्श ग्रामविकासचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:18 IST