चारचाकी वाहनाच्या धडकेत एक जण जखमी
लातूर : घराकडे जात असताना समोरुन येणारी चारचाकी (क्रमांक एम.एच. २४. एल ५५९) ने हयगय व निष्काळजीपणाने फिर्यादी नवनाथ गणपती डोक यांना धडक दिली. यात डोक हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या स्कुटीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नवनाथ गणपती डोक यांच्या तक्रारीवरुन कार क्रमांक एमएच २४. एल. ५५९ च्या चालकाविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ औटे करीत आहेत.
नळगीर येथे काठीने मारहाण
लातूर : नळगीर येथे शिवीगाळ करीत हातामध्ये काठी घेऊन कपाळावर मारुन जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी फिर्यादी बालाजी काशीनाथ मनदुमले यांच्या तक्रारीवरुन शिवाजी काशीनाथ मनदुमलेसह सोबत असलेल्या दोघा जणांविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वाढवणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहेकॉ मुरुडकर करीत आहेत.