येरोळ : येथील आरोग्य उपकेंद्रात गुरुवारी कोविड लसीकरणास प्रारंभ झाला. माजी संरपच मंगेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.एस. पवार, डॉ. अरुण शिरुरकर, अभिषेक वाघमारे, डॉ. बाबासाहेब त्रिभुवन, सरपंच सुकुमार लोकरे, उपसरपंच सतीश सिंदाळकर, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पठाण, गोविंद पोतदार यांची उपस्थिती होती. यावेळी येरोळसह, डिगोळ, सुमठाणा, दैठणा, पांढरवाडी, हणमंतवाडी, जांभळवाडी येथील ४५ वर्षांवरील २०० नागरिकांना लस देण्यात आली. यावेळी आरोग्य परिचारिका आम्रपाली सुतार, आरोग्य सेवक एन.के. बिरादार, संजय बिरादार, शिवंगगा येरोळकर, कोमल देवसाळे, गिताजंली कासार, संध्या जाधव, सुमन वाघमारे, सुनिता शेवाळे, महादेवी लोंढे, एस.एस. पाटील, बी.एच. बनसोडे यांच्यासह समुपदेशक शिक्षक अनंत डोंगरे, एस.पी. मुळे, ए.व्ही. शिंदे, एस. टी. कांबळे यांची उपस्थिती होती.
येरोळ येथील आरोग्य उपकेंद्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST