लातूर शहरातील सह्याद्री येथील शिबिराचे उद्घाटन शिक्षक आ. विक्रम काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. कल्पना किनीकर, प्रा. डॉ. गणेश बेळंबे, ॲड. फारूख शेख, फय्याज पटेल, कलीम पठाण, गंगाधर आरडले यांची उपस्थिती हाेती. शिबिरात १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. मेंदूचे आजार, हाडांचे आजार, स्त्रीरोग, हृदयरोग, मधुमेह, आदी आजारांवरील रोगाचे उपचार, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
गायत्री रुग्णालयात शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. निखिल पिंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी लातूर ग्रामीणचे माजी आ. त्र्यंबक भिसे, डॉ. रमेश भराटे, डाॅ. डी. एन. चिंते, यशवंत पाटील कामखेडकर, डॉ. लक्ष्मीकांत येणगे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. शिवप्रसाद मुंदडा, डॉ. संजय गटकुळे, डाॅ. जावेद सौदागर, डाॅ. विशाल गरड, डाॅ. हलकंचे, डाॅ. प्रतीक बंडगर व इतर कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.