शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचे भाव आवाक्याबाहेर, फाेडणीला महागाईचा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST

बेलकुंड : खाद्यतेलाच्या दरात गत दिवाळीपासून वाढ हाेत आहे. सध्याचे दर तर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने गृहिणींचे स्वयंपाकाचे बजेटही कोलमडले ...

बेलकुंड : खाद्यतेलाच्या दरात गत दिवाळीपासून वाढ हाेत आहे. सध्याचे दर तर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने गृहिणींचे स्वयंपाकाचे बजेटही कोलमडले आहे. सर्वसामान्यांना आता वाढत चाललेल्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीचा सामना करावा लागणार आहे. दिनांक १ डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे.

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढत आहेत. वाढत्या इंधन दरवाढीने सामान्यांचे जगणेच मुश्कील केले आहे. वाहतूक खर्च वाढल्याचा फटका सर्वत्र बसला आहे. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात महागाईच्या झळा सहन करण्याची वेळ सर्वांवरच आली आहे. अशास्थितीत कोरोनामुळे हातचा रोजगार गेल्याने मुंबई, पुण्यासह इतर शहरांतून अनेक कुटुंब गावाकडे परतली आहेत. यातून मिळेल ते काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातच महागाईचा भडका उडाला आहे. १ डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या दरातही शंभर ते सव्वाशे रुपयांची वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांवर तर ‘आपली चूलच बरी’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात चहासाठीच सामान्य कुटुंब गॅसचा वापर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, खाद्यतेलाला पर्याय नाही. स्वयंपाकासाठी खाद्यतेल आवश्यकच आहे. दसरा व दिवाळीमध्ये खाद्यतेलाचा वापर अधिक होत असल्याने त्याचे काही प्रमाणात भाव वाढणे साहजिक होते. पण अपेक्षापेक्षा अधिकच भाव वाढल्याने व्यापारी तर चकीत झाले आहेतच पण याचा सर्वात जास्त त्रास हा सर्वसामान्य कुटुंबाना होत आहे. अवकाळी पावसामुळे सोयाबीन, भुईमुगासह तेलबिया पिकांचे नुकसान झाल्याने त्याचा बाजारातील उलाढालीवर, भावावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पावसाने खरिपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला. सोयाबीन, भुईमूग ही पिके हातची गेली आहेत. सोयाबीनला फटका बसल्याने त्याचा परिणाम तेलाच्या दरावर झाला आहे. विविध प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात दिवाळीनंतर वाढ झाली आहे. ही दरवाढ कमी होण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे.

दसरा आणि दिवाळीपूर्वी सोयाबीनचे १ लीटर तेल ९५ रुपयांना मिळत होते, ते दिवाळीला ९८ रुपये झाले. दिवाळीनंतर दर कमी होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांसह ग्राहकांना होती. मात्र, दर तर कमी झाले नाहीत उलट आहे त्या दरात माेठी वाढ झाली. सध्या हे तेल १३५ ते १४० रुपयांना मिळत आहे.

असे आहेत प्रतिकिलाे तेलाचे दर...

सूर्यफुल १ लीटर दिवाळी आधी ११० रुपये, दिवाळीत ११० ते ११५ रुपये हाेते. सध्या १४० ते १५० रुपये आहे. पामतेल १ लीटर दिवाळीपूर्वी ८५ रुपये तर दिवाळीत ९० ते ९५ रुपये हाेते. सध्या १३० ते १३५ रुपये आहे. शेंगदाणा १ किलो दिवाळीपूर्वी १०० रुपये हाेते तर दिवाळीत १०० ते ११० रुपये झाले. सध्या १७० ते १८० रुपयांच्या घरात गेले आहे. सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या किमती कमी-अधिक झाल्या आहेत. सर्रास ग्राहकांची पामतेल आणि सोयाबीन तेलाची मागणी अधिक असते. परंतु, दिवाळीपासून दररोजच भाववाढ होत असल्याने, त्याचा परिणाम उलाढालीवर दिसून येत आहे. आजपर्यंत एवढी भाववाढ कधीच झाली नव्हती, असे बेलकुंड येथील किराणा दुकानदार विरेंद्र तोळमारे म्हणाले.

महिलांसमाेर काटकसर हाच पर्याय...

दिवाळीत खाद्यतेलाचे भाव वाढले, ते भाव आजही वाढतच आहेत. त्यात गॅस सिलिंडरची भाववाढ हाेत आहे. परिणामी, सर्वसामान्य कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे. अशास्थितीत काटकसरीशिवाय महिलांसमाेर पर्याय उरला नाही. अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. यातून विविध खाद्यतेलांचे भाव वाढले आहेत. खाद्यतेलाचे भाव वाढल्याचा परिणाम इतर वस्तूंच्या भाववाढीवर होणार आहे. हॉटेल, उपाहारगृहातील विविध खाद्यपदार्थ बनविण्यासाठी तेल वापरात येते. त्यामुळे या सर्वच वस्तूंचे भाव वाढण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल आयात केले तरंच तेलाच्या भाववाढीला आळा बसू शकतो. अन्यथा आगामी काही दिवसात तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.