या याेजनेचा उद्देश राज्यातील सुमारे ४० हजार गावांतील गावठाणचे जीआईएस आधारित अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे. ग्रामीण भागातील १ कोटी २० लाख जणांना स्वतःच्या मालकीच्या जागेची मिळकत पत्रिका मिळणार आहे. राज्यात प्रथमच सार्वजनिक जागा, रस्ते यांचीही स्वतंत्र मिळकत पत्रिका आणि नकाशा तयार होणार आहे. यातून गावकऱ्यांना गावठाणातील प्रत्येक मिळकतीचा नकाशा सनद आणि मिळकत पत्रिका तयार होणार आहे. गावठाणातील घराच्या बांधकामासाठी नकाशा उपलब्ध होणार असून, ग्रामस्थ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. त्यामुळे बँकेकडून कर्ज उपलब्ध होण्यासाठी अधिक सुविधा होणार आहे. खरेदी-विक्री सुलभ होऊन फसवणूक टाळली जाणार आहे. मालकीहक्काचा पुरावा मिळाल्यामुळे आपापसातील वाद थांबणार आहेत. यासाठी तालुक्यातील ज्या गावात भूमिअभिलेख अधिकारी येतील त्यादिवशी ग्रामसेवक, सरपंच, तलाठी यांना चुना मार्किंगसाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपअधीक्षक अविनाश मिसाळ यांनी केले आहे.
मार्चअखेरपर्यंत सुरू राहणार याेजना...
ड्रोनद्वारे गावठाण भूमापन मोजणी प्रकल्प राबविल्यामुळे सामान्य जनतेला याचा प्रामुख्याने लाभ हाेणार आहे. मिळकतीच्या नकाशामुळे सीमा निश्चित हाेणार असून, मिळकतीचे नेमके क्षेत्र माहीत हाेणार आहे. सदरची याेजना ३० मार्च २०२१ पर्यंतच असल्याने या याेजनेपासून एकही गाव, वाडी-तांडा वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
- अविनाश मिसाळ, निलंगा