एम.एस्सी. भौतिकशास्त्र या विषयात मोनिका कदम हिने
८५.२८
टक्के गुण घेऊन विद्यापीठात प्रथम आली. प्रांजली सरवदे हिने
८५.२८
टक्के गुण घेऊन द्वितीय तर सपना पवार हिने ८५.१६ टक्के गुण घेऊन याच विषयात तृतीय आली.
याशिवाय एम.एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात विधी पळसापुरे हिने ८७.८८ टक्के घेऊन विद्यापीठात प्रथम आली तर यशश्री दुधाट हिने ८०.७६ टक्के गुण घेऊन ती द्वितीय आली. या यशाबद्दल गुणवंतांचे कौतुक दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, डॉ. ललित ठाकरे, डॉ. राहुल मोरे ,डॉ. विश्वनाथ मोटे, प्रा. श्वेता लोखंडे, प्रा. लहु काथवटे, प्रा. वैशाली चांडक, डॉ. महादेव पंडगे, डॉ. विजेंद्र चौधरी, प्रा. मंगेश आवाळे, प्रा. आयशा सिद्दिकी, प्रा. शैलजा धुतेकर, प्रा. शीतल पाटील, प्रा. पूजा सोनसाळे, डॉ. महेश कराळे आदींनी केले.