किमान सहा तास झोप आवश्यक...
रात्रीच्या वेळेत सलग सहा तास मोठ्या व्यक्तींनी झोप घेणे आवश्यक आहे. लहान मुलांसाठी आठ ते दहा तास झोप आवश्यक आहे. झोपेमुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होत असते. दिवसभरात त्या ऊर्जेचा उपयोग आपल्या कामासाठी करता येत असतो.
अपुऱ्या झोपेचे तोटे...
रात्रीच्या वेळी झोप चांगली न झाल्यास दिवसभर थकवा जाणवतो. अंग जड पडते. कामात मन लागत नाही.
झोप न झाल्याने आळस येतो. यामुळे दिवसभराच्या कामाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
दररोजचीच कमी झोप असेल तर वेगळ्या आजाराच्या व्याधीही निर्माण होऊ शकतात.
रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीराची ढाल...
रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीराची ढाल आहे. त्यामुळे शरीराला विश्रांतीची गरज असते. शरीरातील आतील ऑर्गन ॲक्टिव्ह होण्यासाठी झोप आवश्यक असते. त्यामुळे किमान सहा तास मोठ्या व्यक्तीने झोप घ्यावीच. तर लहान मुलांसाठी आठ ते दहा तास झोप आवश्यक आहे.
संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक
संतुलित आहार आणि व्यायाम महत्त्वाचा आहे. रात्री आठच्या आत जेवणे आणि दहाच्या आत विश्रांती घेणे. या बाबी शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी पोषक आहेत. किमान सहा तास रात्रीची झोप आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.