घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार संजय आंबी हा कोल्हापुराकडून कसबा बीड गावाकडे येत असतांना महे कसबा बीड दरम्यान भोगावती नदी पात्रातील दक्षिण बाजूस असलेल्या बंधाऱ्याच्या संरक्षण कठड्याला दुचाकीचा ताबा सुटल्याने कठड्याला जोरदार धडकून दुचाकीसह संजय आंबी हा युवक नदीपात्रातील वीस फुट खडकाळ जागेवर जाऊन आदळला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. नाका-तोडातून रक्त आल्याने तो जागीच ठार झाला होता. अपघातस्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. त्याला कोल्हापूरच्या सीपीआर दवाखान्यात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संजय आंबी हा गरीब घराण्यातील एकुलता एक होता. तो कोल्हापुरातील एमआयडीसीमध्ये वायडिंग काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण आहे. अपघाताची बातमी कसबा बीड गावात पसरताच नागरिकांतून हळहळ व्यक्त होत होती.
( फोटो ओळ = संजय राजाराम आंबी (वय २३ )रा कसबा बीड, ता. करवीर - अपघात बातमी मयत युवकाचा फोटो )