शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

हवी कशाला टाल्कम पावडर? भिरभिरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:58 IST

- उदय कुलकर्णी घरात लहान मूल जन्माला आलं की, तान्हुल्याची काळजी घेण्याची जबाबदारी भारतात घरातील म्हाताऱ्या बायका पूर्वी स्वखुशीने ...

- उदय कुलकर्णीघरात लहान मूल जन्माला आलं की, तान्हुल्याची काळजी घेण्याची जबाबदारी भारतात घरातील म्हाताऱ्या बायका पूर्वी स्वखुशीने स्वीकारत असत. मुलाची टाळू भरणं, त्याची त्वचा निरोगी व्हावी यासाठी हळद, चंदन आणि बेसन वगैरे मिसळून काही गोष्टी वापरून मुलांना हलक्या हातानं मालीश करणं असं सगळं काही आवडीनं आणि हौसेनं केलं जायचं. आता सगळा आॅनलाईन खरेदी-विक्रीचा मामला. मूल जन्माला येण्याच्या आधीपासून त्याच्यासाठी उत्तम काय याच्या जाहिराती पाहून आॅनलाईन किंवा मॉलमध्ये जाऊन खरेदी सुरू होते. टाळू भरणं, मुलांच्या अंगात तेल जिरवणं हा सगळा जुनाट बायकांचा वेडेपणा आहे, यावर आता सुशिक्षित महिलांनी आणि नव्या बाजार व्यवस्थेनं शिक्कामोर्तब केलं आहे. मुलांचं अंग कोरडं ठेवायचं किंंवा त्यासाठी विशिष्ट कंपनीची टाल्कम पावडरच वापरावी लागते, हे आता मनामनात ठसलंय.

लहान मुलांच्या बाबतीतच काय, मोठ्या माणसांसाठीही आता गोरेपणाकरिता अमूक पावडर आणि तमूक क्रीम हे सर्वतोमुखी झालेलं आहे. जाहिरातींनी अशा गोष्टी मनामनांवर नको इतक्या ठसविलेल्या आहेत. सावळ्या वर्णाच्या भारतीयांमध्ये तर अशा क्रीम आणि पावडरची भयंकर क्रेझ आहे. भारतात अशा पावडरींचं मार्केट किती आहे माहिती आहे? किमान सातशे कोटी रुपयांचं! पण, अनेकांना हे माहितीच नाही की, कॅनडासारख्या देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेनं टाल्कम पावडरचा वापर हा घातक असल्याचं काही तपासण्यानंतर जाहीर केलं आहे.

यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘रिस्क असेसमेंट ड्राफ्ट’मध्ये म्हटलंय की, टाल्कम पावडर श्वसनातून शरीरात जात राहण्याने श्वसनाचे त्रास जसे होऊ शकतात, त्याचप्रमाणे महिलांना ओव्हरी म्हणजे गर्भाशयाशी निगडित कर्करोग होऊ शकतो. कॅनडामधील सार्वजनिक आरोग्य विभागानं आपल्या ड्राफ्टवरती लोकांनी आपले अनुभव आणि मते मांडावीत असंही म्हटलं आहे. लोकांकडून याबाबतच्या निष्कर्षांना दुजोरा मिळाला, तर ६० दिवसानंतर कॅनडाचे सरकार टाल्कम पावडरचा समावेश विषारी पदार्थांमध्ये करणार आहे.

टाल्कम पावडरमुळे खोकला होऊ शकतो, श्वास घेण्यामध्ये अडचण जाणवू शकते. फुप्फुसांची क्षमता कमी होऊ शकते. विशेषत: जननेंद्रियांच्या स्वच्छतेसाठी म्हणून अनेकजण शरीराच्या त्या भागात टाल्कम पावडर फवारतात; पण ही बाबदेखील धोकादायक ठरू शकते, असे आता अभ्यासकांना वाटू लागले आहे. जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच आता इंटरनॅशनल एजन्सी आॅन कॅन्सर आणि डॅनिश एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी याबाबतीत गांभीर्यानं अभ्यास करण्याच्या मागे आहे.

इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्सच्या मुंबई विभागाच्या पदाधिकारी बेला वर्मा यांच्या म्हणण्यानुसार बहुसंख्य भारतीय घाम आणि घामाची दुर्गंधी यापासूनच्या सुटकेसाठी टाल्कम पावडर वापरतात; पण यामुळे त्वचेवरची जी छिदं्र मोकळी राहण्याची आवश्यकता असते तीच बंद होतात आणि याच्या परिणामी वेगवेगळे त्वचारोग उद्भवतात. लहान मुलांच्या बाबतीत तर टाल्कम पावडरच्या अ‍ॅलर्जीचे प्रकारही आढळून येतात.

खरं तर ज्यांचा अभ्यास आहे, असे बालरोगतज्ज्ञ सांगतात की, नवजात मुलांना कोणत्याही प्रकारच्या टाल्कम पावडरची गरज असत नाही. केवळ कोट पाणी त्यांच्या स्वच्छतेसाठी पुरेसं असतं. ना साबणाची गरज असते, ना पावडरची. अगदी क्वचितच एखाद्या बाळाला ग्लिसरीनयुक्त साबणाची गरज असू शकते; पण टाल्कम पावडरची नाही. माहिती नसेल तर माहिती करून घ्यायला हवं की, याच वर्षीच्या जुलै महिन्यात अमेरिकेच्या न्यायालयानं जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनसारख्या कंपनीला एकूण २२ महिलांना जबर नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे, कारण या कंपनीच्या टाल्कम पावडरच्या वापरानं आपल्याला कर्करोगाचा त्रास झाला असा संबंधित महिलांचा दावा आहे.

अर्थात, या दाव्याला कंपनीनं पुन्हा आव्हान दिलेलं आहे हा भाग वेगळा! सांगण्याचा मुद्दा इतकाच की, गोरं दिसण्यासाठी असो किंंवा नव्यानं जन्मलेल्या लहान मुला-मुलींसाठी असो, बड्या कंपन्यांच्या टाल्कम पावडरचा वापर करणे म्हणजे आपण जाहिरातींना भुलून नसत्या आजारांना निमंत्रण तर देत नाही ना! याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. घरातल्या अनुभवी, वृद्ध महिलांचे पारंपरिक ज्ञानच आपण योग्य प्रकारे आधुनिक विज्ञानाच्या आधारे तपासून उपयोगात आणायला काय हरकत आहे?(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)kollokmatpratisad@gmail.com

टॅग्स :docterडॉक्टरmedicinesऔषधं