शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

तिरुपतीच्या धर्तीवर विकासाचा अट्टहास का ?-----भाग - ४

By admin | Updated: September 16, 2014 23:51 IST

बहुजनांची देवता : महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रतीक; आद्यशक्तिपीठ म्हणून व्हावा विकास

इंदुमती गणेश - कोल्हापूर- अलीकडच्या दोन वर्षांत महालक्ष्मी मंदिराचा विकास तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर व्हावा आणि तेथील सर्व प्रथा-परंपरा येथेही लागू करण्याचा अट्टहास केला जात आहे. मग तो नेत्यांकडून तिरुपती-महालक्ष्मी-पद्मावतीच्या विवाह सोहळ्याचा असो, लाडू प्रसादाचा असो, शालूच्या भव्य मिरवणुकीचा असो, अपॉइंंटमेंटद्वारे दर्शनाचा विचार असो किंवा स्थानिक उत्सवात अंबाबाईच्या शेजारी तिरूपती बालाजीची मूर्ती उभारण्याचा असो.या सगळ्या कार्यक्रमांमधून गैरसमजुतीला खतपाणीच घातले जात आहे. अन्य देवस्थानांच्या प्रथा, परंपरांचे अंधानुकरण करण्याऐवजी या देवतेचे खरे रूप ओळखून तिची महाराष्ट्रीय संस्कृती अबाधित राखणे गरजेचे आहे, अन्यथा मंदिराचा मूळ इतिहास पुसला जाईल. महालक्ष्मीलाच विष्णुपत्नी लक्ष्मी समजून साडी घेऊन येण्याची पद्धत वीस वर्षांपूर्वी देवस्थान समितीने सुरू केली, त्यामागे कोणताही धार्मिक संदर्भ नाही. श्रीपूजकांचे म्हणणे ऐकलेच जात नसल्याने त्यांनीही कधी विरोध केला नाही. समितीचे जुनेजाणते पदाधिकारी, कोल्हापूरचा इतिहास जाणणारी बुजुर्ग मंडळी, महालक्ष्मी मंदिरात पिढ्यान्पिढ्या सेवा देणारे सेवेकरी, मंदिर आणि मूर्ती अभ्यासक, वेदशास्त्र पंडित यांच्यासह कोल्हापूरकरांना माहीत आहे की, ही देवता विष्णुपत्नी नाही, ते उघड-उघड या नव्या पद्धतीबद्दल विरोधही दर्शवितात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महालक्ष्मीला येणाऱ्या भाविकांची संख्या तिपटीने वाढल्याने देवी विष्णुपत्नी असल्याचा चुकीचा प्रसारही तितक्याच झपाट्याने होत आहे. खुद्द कोल्हापुरातील काही संस्था व मंदिराचा मूळ इतिहास माहीत नसलेली नव्या पिढीतील मंडळी जाणते-अजाणतेपणी हा चुकीचा प्रसार करीत आहेत, जो मंदिराच्या मूळ इतिहासाला, देवीच्या उपासना पद्धतीला छेद देणारा आहे. कारण या मंदिराचे सर्व धार्मिक विधी, परंपरा या महाराष्ट्रीय संस्कृतीच्या आहेत. या देवीचा मूळ प्रसाद शुक्रवारचे फुटाणे असताना लाडू प्रसाद सुरू झाला. रथोत्सवादरम्यान गुजरीतील मंडळाने महालक्ष्मीशेजारी बालाजीची प्रतिकृती उभारली. तिरुपती देवस्थानच्या मदतीतून दोन्ही देवस्थानांना एकत्र जोडून त्याच धर्तीवर महालक्ष्मी मंदिराचा विकास करण्याचा कॉर्पोरेट मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीचा विचार केला गेला. हा सगळा प्रकार मूळ इतिहासाला बाधक ठरणारा आहे. या मंदिराचा धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकास नक्कीच व्हावा; पण फक्त पर्यटनवृद्धीसाठी, मार्केटिंंगसाठी श्रीमंत देवस्थानांप्रमाणे तेथील प्रथा-परंपरांचे अंधानुकरण करण्याऐवजी आद्य शक्तिपीठ म्हणून या देवीचे असलेले महाराष्ट्रीय संस्कृतीचे मूल्य जपत या मंदिराचा विकास व्हावा. अन्यथा या मंदिराचा मूळ इतिहास झाकोळला जाऊन दक्षिणेतील नवनव्या प्रथांना सुरुवात होणार आहे, जो देवतेच्या मूळ स्थानाला, येथील प्रथा-परंपरांना मारक ठरणारा आहे. वाराणस्या यवाधिकम..‘आद्यं तु वैष्णंक्षेत्रं शक्त्यागमसमन्वितम भुक्ति-मुक्तिप्रदं नृणां वाराणस्या यवाधिकम...’ म्हणजेच हे आद्यवैष्ण क्षेत्र. शक्ती अर्थात सतीमातेच्या अधिष्ठानामुळे भुक्ती व मुक्ती देणारे वाराणसीपेक्षाही यवमात्र श्रेष्ठ आहे. तिरूपती बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन घेतले नाही तर ही यात्रा परिपूर्ण होत नाही, असा अलीकडे समज झाला आहे. कोणत्याही तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर घरातील कुलदेवतांचे पूजन केले जाते, त्याचप्रमाणे मातृभावनेने आपण केलेली तीर्थयात्रा या जगन्मातेला वंदन करून पूर्ण करायची, असा याचा अर्थ आहे. त्यामागे ते पती-पत्नी असण्याचा संबंध नाही.