शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’पेक्षा जादा उचल मिळणार

By admin | Updated: November 2, 2016 01:08 IST

कारखानदारांची तयारी : पहिली उचल निश्चितीसाठी समितीची नियुक्ती; आज पुन्हा बैठक; चंद्रकांतदादांची माहिती; तोडगा १५० की २०० रुपयांवर?

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात ‘एफआरपी’पेक्षा थोडी जादा उचल देण्यास कारखानदार अनुकूल आहेत. ही उचल किती व कधी द्यायची याबाबत साखर कारखानदार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची समिती नेमली असून आज, बुधवारी समितीच्या दुपारच्या दोनच्या बैठकीत तोडगा निघून शनिवार (दि. ५) पासून हंगाम निश्चितच सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ऊसदराबाबत मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, ‘भारतीय किसान’चे मदन देशपांडे, सकल शेतकरी संघटनेचे दादा काळे, यशवंत देसाई, आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, माधव घाटगे, समरजितसिंह घाटगे, अशोक चराटी, आदी उपस्थित होते. कारखानदार एकरकमी एफआरपी देण्यास तयार आहेत, पण ‘७०:३०’ सूत्रानुसार त्यातील काही रक्कम घालून पहिली उचल द्यावी, असा आग्रह शेतकरी संघटनांचा आहे. याबाबत सखोल चर्चा होऊन एफआरपीपेक्षा थोडी जादा उचल देण्यास कारखानदार तयार झाले आहेत; पण ती किती व कधी द्यायची याबाबत चर्चा करण्यासाठी समिती नेमली असून ती आज, बुधवारी निर्णय घेईल, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. कारखानदार व संघटनांच्यामध्ये समन्वय ठेवत आजच्या बैठकीत तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दोन बैठकांतील चर्चेचा सूर पाहिला तर चंद्रकांतदादा जो तोडगा काढतील, तो संघटना व कारखानदार मान्य करतील, अशी स्थिती आहे. कारखानदार एफआरपीपेक्षा काहीतरी जादा देण्यास तयार आहेत. शेतकरी संघटनाही लवचिक धोरण स्वीकारणार असल्याने आजच्या बैठकीत ‘एफआरपी’सोडून दीडशे ते दोनशे रुपयांवर तडजोड होण्याची शक्यता आहे. सगळेच कारखाने बंद ठेवा : चंद्रदीप नरके गेल्यावर्षी साखरेचे दर घसरल्याने २६५० रुपये एफआरपी देताना अडचण आली. गतवर्षीचा २० ते ३० कोटींचा तोटा आहे. तोटे व कर्जे कशी भागवायची? आता एकरकमी ‘एफआरपी’ देण्यास आम्ही तयार आहोतच त्याचबरोबर ‘७० :३०’ नुसार जे काही बसेल ती देतो. बँकेकडून उचल देण्याची जबाबदारी सरकारने उचलावी, अशी मागणी करत कृषीमूल्य आयोगाने ‘एफआरपी’ ठरविताना साखरेचा दर विचारात घेतला पाहिजे, असे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. कोंडी फुटल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला राजरोस गाळप सुरू करायचे? दादा परवानगी द्यायची तर सगळ्यांना द्या अन्यथा सगळ्यांचेच कारखाने बंद करा, अशी संतप्त मागणी नरके यांनी केली. संघटनांचा ‘सीए’ नेमून काळे-पांढरे बाहेर काढाच : मुश्रीफ राजू शेट्टी व रघुनाथदादा पाटील यांनी मार्चनंतरच्या साखर विक्री नफ्याचा विषय ताणून धरला. त्यावर संतप्त झालेले आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, संघटनांनी कारखानानिहाय आपला ‘सीए’ नेमावा, ३२०० रुपये दर कसा परवडतो, ते तुम्हीच दाखवा. वस्तुस्थिती बघून जर तुम्ही बोलणार नसाल तर कारखानदारी अडचणीत येईल. साखर १८०० रुपये असताना कर्जे काढून एफआरपी दिली. सगळ्यांना वाटते कारखानदार काहीतरी काळे-बेरे करतात. एकदा ‘सीए’ नेमाच आणि काळे-पांढरे बाहेर काढाच, असे उघड आव्हान मुश्रीफ यांनी दिल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले. साखरेचे दर वाढले तर त्याचा हिशेब पुढच्या हंगामात येतोच, भविष्यात साखरेचे दर जास्त वाढणार आहेत, असे भासविले जाते, पण ४० रुपयांच्या पुढे सरकार दर जाऊ देणार नाही. त्याचा ठोकताळा कुठेतरी घातला पाहिजे. हंगाम ११० दिवस चालणार नाही, दोन-तीन महिने कामगार बसून राहणार असल्याने त्यांच्या पगाराचे काय करायचे, सगळ्या बाजूंचा विचार करून संघटनेने हट्ट करावा, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. साडेतीन हजार घेणारच : रघुनाथदादा पाटील साखरेसह उपपदार्थांचे पैशांचे गणित घालूनच साडेतीन हजार रुपयांची मागणी केली आहे. उत्पादनखर्च वाढला असताना एफआरपीशी तडजोड कदापि मान्य करणार नाही. कोण काय मागतो हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. साडेतीन हजार घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. साखर कारखान्यांनी औदार्य दाखवावे : राजू शेट्टी कारखानदारी टिकली पाहिजे, याची जाणीव आम्हाला असल्यानेच गेल्यावर्षी तडजोड केली. यावर्षी दर चांगला असल्याने साखर कारखानदारांनीही थोडे औदार्य दाखवून दोन पावले पुढे यावेत, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले. अजूनही आम्ही ३२०० रुपयांवर ठाम आहे, कारखानानिहाय आम्ही हिशेब देण्यास तयार आहोत. रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ज्या कारखान्याचे उपपदार्थ निर्मिती नाही त्यांनी उत्पन्नातील ७० टक्के तर ज्यांच्याकडे सहवीज, डिस्टीलरी, स्पिरीटचे उत्पादन आहे, त्यांनी ७५ टक्के शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. त्यातील थोडी रक्कम एफआरपीमध्ये घालून पहिली उचल द्या, एवढीच आमची मागणी असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. शिवसेनेचा आंदोलन स्थगित : विजय देवणे पहिल्या उचलीबाबत आज बैठक