शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

साईडपट्ट्या नसल्याने मृत्यूचाच मार्ग

By admin | Updated: December 4, 2014 00:37 IST

कोल्हापूर-गगनबावडा रस्ता : अवघ्या सात महिन्यांत उखडला, सखोल चौकशीची मागणी

प्रकाश पाटील / कोपार्डे कोल्हापूर-गगनबावडा मार्ग हा कोल्हापूर शहराला जिल्ह्याचा पश्चिम भाग जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. या रस्त्यावरुन प्रशासकीय कामांबरोबर शिक्षण, व्यवसायासाठी दररोज प्रवास करणारा एक मोठा वर्ग आहे. त्याशिवाय याच मार्गावरून पाच साखर कारखान्यांची ऊस वाहतूक केली जाते; पण खड्डेमय अरुंद रस्त्याबरोबरच साईडपट्टया नसल्याने वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. अनेक विचित्र अपघात या रस्त्यावर घडले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या राज्य मार्गांची लांबी ५४ किलोमीटर आहे. साखर कारखान्यांचे हंगाम सुरू झाले, की अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅमचे चित्र पाहायला मिळते. रस्त्यात खड्डे, रस्त्याच्या बाजूपट्ट्या भरल्या न गेल्याने अवजड वाहनधारक रस्त्यावरून वाहन बाजूला घेण्यास तयारच नसतात. अवजड वाहने अगदी कमी वेगानेच चालवावी लागतात. त्यात उसाने भरलेले ट्रक, ट्रॉली व बैलगाड्या यांचे प्रमाण मोठे असल्याने या मार्गावरून वाहन चालविताना खड्डा चुकविण्याच्या नादात चालक आपली बाजू सोडून विरुद्ध दिशेला जातो. यामुळे अनेकवेळा विचित्र अपघात घडत असून अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. तसेच या खड्यांमुळे अनेक वाहने खराब झाल्याची पहावयास मिळतात. कोपार्डे ते कळे (ता. पन्हाळा) या मार्गावर अनेक ठिकाणी बी.बी.एम.चा रस्ता करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याला कारपेटचा मुलामाच दिला गेलेला नाही. याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, हा रस्ता पाच मीटरऐवजी सात मीटरचा करण्यात येणार आहे. यासाठी कारपेट थांबविण्यात आल्याचे सांगितले. मात्र, बी.बी.एम. पूर्ण उखडले असून, हे काम मार्च व एप्रिल २०१४ मध्ये करण्यात आले होते. केवळ सात महिन्यांत रस्ता उखडला असून, तात्पुरती मलमपट्टी करुन रस्त्याच्या कामाची बिले उचलली गेल्याचा प्रकार आहे. संबंधित कामातून कोट्यवधींचा मलिदा ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांनी मिळविला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याबाबतची चौकशी होण्याची मागणी जनतेतून होत आहे.