जयसिंगपूर : शेतजमिनीच्या वादातून उदगाव (ता. शिरोळ) येथे घर, जनावरांचा गोठा, पत्र्याचे शेड जेसीबी मशीनच्या साहाय्याने पाडून सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी जयसिंगपृूरच्या सातजणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
संतोष खामकर, निसार ईनामदार, अक्षय जंगम, इरफान शेख, जुलेखा मुल्लाणी, कदम व वैशाली (पूर्ण नाव नाही) अशी संशयित आरोपींची नावे असून याबाबतची तक्रार प्रीती मेघराज कोळी यांनी पोलिसांत दिली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.
चिंचवाड मार्गावर गट नं. ५२७ मध्ये शेतजमिनीवरून न्यायालयात वाद आहे. सोमवारी शेतात ट्रॅक्टर मारत असताना संतोष खामकर यांना विरोध झाला. यावेळी वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर सायंकाळी तक्रारदार कोळी यांच्यासह कुटुंबातील सदस्य शिरोळ तहसील कार्यालयात गेले असताना खामकर यांच्यासह आठ ते दहाजणांनी कोळी यांचे राहते घर, जनावरांचा गोठा याचे जेसीबीच्या साहाय्याने नुकसान केले. याप्रकरणी रात्री उशिरा जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.