शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दररोज ९० कोटींची उलाढाल थंडावली

By admin | Updated: August 4, 2015 00:30 IST

वस्त्रनगरी इचलकरंजी : ६० टक्के कापड उत्पादन ठप्प; सायझिंग संप, ‘बालोत्रा बंद’चा परिणाम

इचलकरंजी : शहरात सुरू असलेला सायझिंग कामगारांचा संप आणि बालोत्रा-राजस्थान येथील बंद असलेल्या कापडावर प्रक्रिया करणारे प्रोसेसर्स याचा परिणाम यंत्रमाग कारखान्यांवर झालाा असून, सुमारे ६० टक्के कापड उत्पादन ठप्प झाले आहे. त्यामुळे वस्त्रनगरीमध्ये दररोज होणारी ९० कोटी रुपयांची उलाढाल थंडावली आहे.यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी ताबडतोब केली पाहिजे, या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने सुरू केलेल्या संपाला दोन आठवडे उलटले. त्यामुळे शहर व परिसरातील सुमारे १४० सायझिंग कारखाने बंद पडले असून, त्यांचेही दररोज होणाऱ्या सूत बिमांचे उत्पादन ठप्प झाले आहे. सूत बाजारामध्ये दररोज होणारी सुताची उलाढाल मंदावली असून, साठ कोटींहून अधिक रुपयांच्या सुताची उलाढाल थांबली आहे.सायझिंग कारखान्यांकडून यंत्रमागासाठी अत्यावश्यक असलेल्या सुताची बिमे मिळत नसल्याने आता शहर व परिसरातील साठ टक्के यंत्रमाग बंद पडले आहेत. त्यातून होणारे दररोज ९० कोटी रुपयांचे कापड उत्पादनसुद्धा ठप्प झाले आहे. आणखीन आठवडाभर हा संप चालला, तर उर्वरित यंत्रमागसुद्धा बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.आॅटोलूमसाठी लागणाऱ्या सूत बिमांच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शहरात दररोज होणारी सुताची आवक थंडावली आहे. बाजारामध्ये गेल्या आठवड्याभरापासून प्रतिकिलो सुताच्या दरात दहा ते पंधरा रुपयांनी घट झाली असली, तरीसुद्धा गिऱ्हाईक मिळत नसल्याने सुताची खरेदी-विक्री होईनाशी झाली आहे.दरम्यान, राजस्थानातील बालोत्रा येथे असलेले प्रोसेसर्स प्रदूषणाच्या कारणामुळे १५ मेपासून बंद करण्यात आले आहेत. याबाबतची सुनावणी नवी दिल्ली येथील हरित लवादासमोर सुरू असून, ३१ जुलै रोजी होणारी सुनावणी आता ७ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. हरित लवादासमोरील सुनावणी अत्यंत कडक असल्यामुळे त्यादिवशीसुद्धा काही तोडगा निघेल किंवा निर्णय होईल, याबाबतची साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथील वस्त्रोद्योगाची परिस्थिती दयनीय होत आहे. (प्रतिनिधी)सूत कापड वाहतूक अडचणीतइचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाच्या बिघडणाऱ्या स्थितीमुळे शहरातील कापड व सूत वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. बालोत्र्याला दररोज वीस ट्रक जाणारे कापड बंद झाले असून, पालीस जाणाऱ्या कापडाच्या वाहतुकीवर ७० टक्के परिणाम झाला आहे. तर दररोज ८० ट्रक येणारे सूत आता सरासरी दहा ते पंधरा ट्रक इतकेच येत आहे, अशी माहिती इचलकरंजी ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे आनंदराव नेमिष्टे यांनी सांगितली.