शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

राजकीय बेरजेसाठी ‘मनशे’ एकत्र

By admin | Updated: October 5, 2014 23:35 IST

महाडिक-नरके-शेट्टींच्यात गुफ्तगू : ‘दक्षिण’च्या बदल्यात शिरोळसह चंदगडमध्ये संघटनेला मदतीची अपेक्षा

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, कॉँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी राजाराम साखर कारखान्यावर गुफ्तगू झाले. राधानगरी, चंदगड व शिरोळ मतदारसंघांत महाडिक गटाने ‘स्वाभिमानी’ला पाठबळ द्यायचे, त्याबदल्यात ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘दक्षिण’मध्ये ताकदीने अमल महाडिक यांच्या पाठीशी राहील, असे ठरल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. ‘करवीर’मध्ये स्वाभिमानीने चंद्रदीप नरके यांना सहकार्य करण्याची विनंती अरुण नरके यांनी शेट्टी यांना केली. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे प्रमुख पक्ष स्वबळावर लढत असल्याने सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती आहेत. मतदान दहा दिवसांवर आले तरी अजूनही मतदारांचा अंदाज लागत नसल्याने उमेदवार गोंधळात आहेत. आपल्या मतांच्या पॉकेटशिवाय विरोधकांच्या मतांवर डल्ला मारल्याशिवाय विजय सोपा नसल्याची जाणीव झाल्याने पडद्याआड बेरजेची गणिते मांडली जात आहेत. ही बैठक म्हणजे अशा गणितांची जोडणी होती. ‘दक्षिण’मध्ये सतेज पाटील व अमल महाडिक यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात पूर्वेकडील काही गावांत शेट्टी यांना मानणारा मतदार आहे. राज्यात शेट्टी हे भाजपसोबतच आहेत; परंतु संघटना या मतदारसंघात अजून प्रचारात कुठेच उतरलेली नाही. त्याचेही कारण आहे. लोकसभेला शेतकरी संघटनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या विनय कोरे यांना महाडिक भेटले होते. तसेच माजी आमदार सत्यजित पाटील यांना काँग्रेसकडे जोडून देण्यातही महाडिक यांनीच पुढाकार घेतल्याचा राग संघटनेला आहे. त्यामुळे युती असली तरी शेट्टी ‘दक्षिण’मध्ये ‘वचपा’ काढणार, हे उघड गुपित होते. ते लक्षात आल्यामुळेच महाडिक यांनी शेट्टी यांची मनधरणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने राजाराम कारखान्यावर महाडिक व शेट्टी यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. यामध्ये महाडिक यांनी ‘दक्षिण’मध्ये अमल यांच्या मागे ताकदीने उभे राहण्याची विनंती केली. शेट्टी यांनी मदत करण्याची तयारी दर्शवली, पण त्याबदल्यात शिरोळ, राधानगरी व चंदगड मतदारसंघात महाडिक यांनी ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारांना मदत करावी, अशी अट घातली. दोन्ही नेत्यांनी मदतीची ग्वाही दिल्याचे समजते. ‘करवीर’मध्ये चंद्रदीप नरके यांना मदत करण्याची विनंती अरुण नरके यांनी शेट्टी यांना केली. या मतदारसंघात भाजप-‘स्वाभिमानी’ युतीचा उमेदवार रिंगणात असल्याने तसे करता येणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितल्याचे समजते.