शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

अर्ज भरण्यासाठी आज उडणार झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 01:19 IST

नगरपालिका निवडणूक : जिल्ह्यात नगरसेवकपदासाठी ६९९, नगराध्यक्षपदासाठी ६६ उमेदवारी अर्ज दाखल; आज अंतिम मुदत

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा नगरपालिका व तीन नगरपरिषदांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून शुक्रवारी नगरसेवकपदासाठी ४८४ (आजअखेर ६९९), तर नगराध्यक्षपदासाठी ३८ (आजअखेर ६६) अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज, शनिवारी अंतिम दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी आज उमेदवारांची झुंबड उडणार आहे. आॅफलाईन पद्धतीनेही अर्ज स्वीकारले जाणार असल्याने उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.नगरसेवकपदासाठी सर्वाधिक गडहिंग्लजमध्ये अर्ज दाखल झाले असून, कागलमध्ये ९४ अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी कागलमध्ये सर्वाधिक १४ अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे पेठवडगावमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. (प्रतिनिधी)भाजपचे नगराध्यक्षपदाचे पाच उमेदवार जाहीरनगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवसाचा अवधी असतानाच भाजपने नऊपैकी पाच नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करून इतर पक्षांवर आघाडी घेतली. ही निवडणूक सत्ताधारी भाजपने किती मनावर घेतली आहे याचेच प्रत्यंतर त्यातून आले. हे पाचही उमेदवार आता भाजपच्या चिन्हांवर लढणार असले तरी त्यापैकी एकही पूर्वाश्रमीचा भाजपचा कार्यकर्ता नाही. पक्षात आल्यानंतर त्यांना ही संधी मिळाली आहे. (पान १० वर) उमेदवार असे :इचलकरंजी : अ‍ॅड. अलका अशोक स्वामी वडगांव : डॉ. अशोक अण्णासाहेब चौगुले मलकापूर : अमोल मधुकर केसरकर गडहिंग्लज : वसंत रामचंद्र यमगेकर कुरुंदवाड : रामचंद्र भाऊ डांगेघाटगे-मंडलिक युतीकागल व मुरगूड नगरपालिकेत पालकमंत्र्यांनी समरजित घाटगे यांना पक्षाचे सर्वाधिकार दिले आहेत. तिथे घाटगे व शिवसेनेचे संपर्कनेते संजय मंडलिक यांच्यात युतीच्या वाटाघाटी सुरू आहेत. अर्ज माघारीची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत असल्याने तोपर्यंत या युतीला अंतिम रूप येऊ शकेल, असा विश्वास दोन्ही गटांनाही आहे.भाजप कुठे कुणाबरोबर..इचलकरंजीत स्थानिक सर्वपक्षीय आघाडीसोबतवडगांवला ‘जनसुराज्य’सोबतकुरुंदवाड व मलकापूरला स्वबळावरकागल-मुरगूडला सर्वाधिकार समरजित घाटगे यांना