इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांचा पाडाव करण्यासाठी मी स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोललो होतो. पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवून वाईट प्रवृत्तीला घालवायचे असा आमचा प्रस्ताव होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी एकास एक होत असेल तर आमचाही पाठिंबा राहील, असा शब्द दिला होता. मात्र जितेंद्र पाटील यांच्या हटवादीपणामुळे हा प्रयोग फसला. अन्यथा वेगळे चित्र दिसले असते. अजूनही वेळ गेलेली नाही. काँग्रेसने या प्रस्तावाचा विचार करावा, अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली.पेठनाका (ता. वाळवा) येथील नानासाहेब महाडिक यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. खा. शेट्टी म्हणाले की, माजी मंत्री प्रतीक पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी इस्लामपूर मतदारसंघातील उमेदवारी आणि एकास एक लढतीच्या प्रस्तावावर बोललो होतो. त्यांनीही पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. मतदारसंघातील जनतेची येथे बदल करण्याची भावना आहे. पूर्वी पर्याय नव्हता, मात्र आता पर्याय होते. अशी सगळी परिस्थिती जमून आली असताना जितेंद्र पाटील, बी. जी. पाटील यांनी हटवादीपणा केला. यावेळी त्यांनी बी. जी. पाटील यांच्यावरील कारवाईच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले. यावेळी शिवाजीराव नाईक, सम्राट महाडिक, अभिजित पाटील, सुखदेव पाटील, दि. बा. पाटील, प्रकाश पाटील, नगरसेवक कपिल ओसवाल, सोमनाथ फल्ले, चेतन शिंदे, सतीश महाडिक, सुजित थोरात उपस्थित होते. (वार्ताहर)महाडिक शिवाजीराव नाईकांच्या पाठीशीमहाडिक म्हणाले की, स्वाभिमानीची उमेदवारी मला दिली होती. खा. शेट्टी यांची काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर एकास-एक उमेदवारी देण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी शब्द फिरवून आम्हाला फसवले आहे. त्यामुळे सर्वांमध्ये एकवाक्यता असावी, या धोरणाने शिराळ्यामध्ये शिवाजीराव नाईक व इस्लामपूरमध्ये अभिजित पाटील यांना पाठिंबा देत आहोत.
अजूनही वेळ गेली नाही, काँग्रेसने विचार करावा
By admin | Updated: October 2, 2014 23:49 IST