पोलिसांतून मिळालेली महिती अशी, बांबवडे येथील देशी दारू दुकानदार कृष्णात कुऱ्हाडे संध्याकाळी दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यास संबंधित दुकानदार आले असता या दुकानाच्या दोन्ही बाजूंच्या शटरची लॉक तोडली असल्याचे दुकान मालकांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत अधिक चौकशी केली असता दुकानातील स्टॉक ठेवायचा दरवाजाच्या कडीकोयंडा काढून अज्ञाताने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्क व अन्य माल असा एकूण ३ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. अज्ञातांनी दुकानातील ३ लाख ७६ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची फिर्याद कृष्णात कुऱ्हाडे यांनी पोलिसांत दिली आहे.
मलकापूर दारू दुकानात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:24 IST