शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

हाळवणकर यांना बळ, इचलकरंजीत कमळ

By admin | Updated: October 20, 2014 00:42 IST

लोकसभेसारखीच स्थिती

राजाराम पाटील / अतुल आंबी - इचलकरंजी --विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय, राष्ट्रवादी कॉँग्रेससह भाजप-शिवसेना यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी इचलकरंजीकरांनी आमदार सुरेश हाळवणकर यांना बळ देत पुन्हा कमळ फुलविले. हाळवणकर व कॉँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यात लढत झाली. आमदार हाळवणकर यांना १५,२२५ चे मताधिक्य मिळाले, तर राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांच्यासह सर्वांनाच अनामत गमवावी लागली.राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये आज, रविवारी सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीस सुरुवात झाली. चौदा टेबलांवर होणाऱ्या मतमोजणीसाठी १८ फेऱ्या होत्या, तर पोस्टल ३३४ मते दोन टेबलांवर मोजली गेली. सुरुवातीच्या फेरीपासूनच हाळवणकर यांनी मताधिक्य घेतले. पहिल्या १४ इलेक्ट्रॉनिक यंत्रांत १ ते १३ यंत्रे कोरोची गावाची व एक तारदाळमधील होते. या फेरीत हाळवणकर यांना ६०३७, आवाडेंना ३७०३ व कारंडेंना ६८६ मते मिळाली. मतमोजणीच्या फेऱ्या मोजल्या जात असताना सुरेश हाळवणकर यांचे मताधिक्य वाढत गेले.हाळवणकर यांना चंदूर वगळता ग्रामीण परिसरातील चार गावांत मताधिक्य मिळाले, तर शहापूर, नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ व ८, विक्रमनगर, प्रभाग क्रमांक २ व ९, तसेच गावभागातील अवधूत आखाडा, टाकवडे वेस, बौद्ध विहार, आंबी गल्ली, श्रीपादनगर, जुना चंदूर रोड परिसरात आवाडेंना, तर उर्वरित शहरात हाळवणकर यांना मताधिक्य मिळाले. राज्यात आघाडी फुटली आणि भाजप-शिवसेना युती तुटली आणि कॉँग्रेसचे प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे मदन कारंडे, भाजपचे सुरेश हाळवणकर, शिवसेनेचे मुरलीधर जाधव असे उमेदवार उभे राहिले. बहुरंगी लढतीत आवाडे, हाळवणकर यांच्या स्पर्धेत राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांनीही आपले घोडे पुढे दामटले आणि रंगत निर्माण केली; पण मतमोजणीनंतर मात्र आवाडे-हाळवणकर अशीच एकास एक लढत झाली आणि आवाडे यांना हार पत्करावी लागली.पत्रकारांचे ठिय्या आंदोलनमतमोजणी होणाऱ्या राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना त्यांच्या कॅमेऱ्यासह प्रवेश देण्यास निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी नकार दिल्याने सुमारे दीड तास पत्रकारांना ठिय्या आंदोलन करावे लागले. ठिय्या आंदोलन सुरू असलेल्या बातम्यांचे वृत्त चित्रवाहिनीवर झळकू लागल्याने अखेर जिरंगे यांना माघार घ्यावी लागली आणि त्यांनी छायाचित्रकार व पत्रकारांना प्रवेश दिला.‘नोटा’ची १५०५ मतेनिवडणुकीसाठी एकूण १ लाख ९९ हजार ९४९ मतदान झाले होते. त्यापैकी ४७.११ टक्के मते हाळवणकरांना, ३९.५ टक्के मतदान आवाडेंना, तर ७.५ टक्के कारंडे यांना मिळाली. तसेच, मतदानाचा (नोटा) हक्क ०.७५ टक्के मतदारांनी बजावला.पोस्टाच्या १५४मतपत्रिका अवैधपोस्टामार्फत ३३४ मतपत्रिका मिळाल्या. त्यापैकी फक्त १५० मतपत्रिका वैध ठरल्या. त्यामध्ये ७९ मते हाळवणकरांना, ४९ मते आवाडेंना व १२ मते अन्य उमेदवारांना मिळाली. विशेष म्हणजे १२०० मतपत्रिका पोस्टल मतदारांसाठी पाठविण्यात आल्या होत्या.लोकसभेसारखीच स्थितीनुकत्याच झालेल्या एप्रिल २०१४ मधील लोकसभा निवडणुकीवेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राष्ट्रीय कॉँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यात २० हजार मतांचा फरक होता. काहीसा कमी होत, तसाच फरक विधानसभा निवडणुकीतही आमदार हाळवणकर-प्रकाश आवाडेंमध्ये राहिला.कडक बंदोबस्त मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र व शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त नेमला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, पोलीस निरीक्षक भीमानंद नलवडे, संजय साळुंखे, सतीश पवार यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रमुख मंजू थापा हे प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. चार दिवस स्ट्रॉँगरूममध्ये ठेवलेल्या मतपेट्यांची सुरक्षा व्यवस्था या दलाने पार पाडली.