शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

लोकाभिमुख धोरणांमुळे राज्यात राजकीय स्थैर्य

By admin | Updated: September 5, 2014 23:24 IST

वसंत भोसले यांचे प्रतिपादन : शांतारामबापू गरूड स्मृतिदिनी ‘महाराष्ट्र विधानसभेची वाटचाल’ विषयावर व्याख्यान

इचलकरंजी : स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्राच्या रचनेमध्ये भौगोलिक स्थित्यंतरे झाली. त्याचा राज्याच्या राजकारणावर परिणाम दिसून आला, पण राज्याच्या विधानसभेने वेळोवेळी पुरोगामी विचारसरणीने आणि विकासात्मक ध्येय-धोरणांना अनुसरून घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्रात कधीही अस्थिरता आली नाही. अलीकडच्या काळात समाजकारणापासून राजकीय पक्षांची फारकत होऊ लागल्याने राजकारणात आता अस्थिरता जाणवू लागली आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केले.येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये प्रबोधिनीचे संस्थापक आचार्य शांताराम गरुड यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र विधानसभेची वाटचाल’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे वय ५४ असले तरी राज्याच्या विधानसभेचे वय ७७ आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९३७ मध्ये ब्रिटिशांनी प्रांतिक विधानसभेची स्थापना केली. त्या काळापासूनच विधानसभेवर कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. महाराष्ट्राच्या सन १९८० पर्यंतच्या कालखंडात सर्वच विधानसभांमध्ये कॉँग्रेसचे बहुमत होते. सर्व विरोधी पक्षांचे मिळून ३० ते ४० आमदार असत. मात्र, त्या काळातील विरोधी पक्षांच्या अभ्यासू लोकप्रतिनिधींमुळे सत्ताधाऱ्यांवर एक प्रकारचा अंकुश असे. विरोधकांच्या प्रभावामुळे आणि राज्यात असलेली लोकाभिमुख सहकार चळवळ, पुरोगामी विचारसरणी, विकास-विधायक कामांसाठी होणारी ध्येय-धोरणे यामुळे महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला. एक वैचारिक बैठक राज्याच्या राजकारणाला असल्यामुळे राजकीय क्षेत्रात कधीही अस्थिरता आली नाही. महाराष्ट्राचा इतिहास अत्यंत चांगला आहे. मात्र, अलीकडच्या काळामध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता वर्तमान फारसा बरा नाही. वास्तविक पाहता सध्या सरकारकडे पैसा, आधुनिक तंत्रज्ञान, साधनसामग्री, सुशिक्षित मनुष्यबळ विपुल प्रमाणात उपलब्ध असतानासुद्धा राजकीय दिवाळखोरीमुळे विकासाची संधी गमावत आहे. राजकीय कुरघोड्या खेळण्यातच स्वारस्य असलेल्या लोकप्रतिनिधी व नेते यांची लोकांप्रती असलेली संवेदना बोथट झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला आचार्य गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. नगरसेवक शशांक बावचकर यांनी स्वागत केले, तर प्रा. रमेश लवटे यांनी प्रास्ताविक केले. अन्वर पटेल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)