शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

स्टार डमी १०६०...वयाच्या चाळीशीनंतर लायसन्स काढण्यासाठी लागणार डाॅक्टरांचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयात चाळीशीनंतर लर्निंग अथवा पक्के लायसन्स काढावयाचे म्हटले तर एमबीबीएस डाॅक्टरांकडून शारीरिकदृष्ट्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयात चाळीशीनंतर लर्निंग अथवा पक्के लायसन्स काढावयाचे म्हटले तर एमबीबीएस डाॅक्टरांकडून शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे लागत होते. आता मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली आहे. त्या अंतर्गत घरबसल्या लायसन्स काढणे साेपे झाले आहे. त्यामुळे चाळीशीच्या पुढील नागरिकांना लायसन्स काढताना वा नूतनीकरण करताना हेच प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहे. तरच लायसन्स मिळणार आहे.

वाहनचालक हा वैद्यकीय व शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तरच तो व्यवस्थित वाहन चालवू शकतो. त्यामुळे वयाची चाळीशी ओलांडणाऱ्यांना एमबीबीएस डाॅक्टरांकडून ऑफलाईन पद्धतीने वैद्यकीय प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयास बंधनकारक होते. आता लायसन्स काढण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सुविधा ॲपद्वारे सुरू केली आहे. त्यामुळे घरबसल्या हे लायसन्स वाहनधारकांना मिळणार आहे. चाळीशी ओलांडलेल्या वाहनधारकांना लायसन्स काढावयाचे अथवा नूतनीकरण करावयाचे असेल तर डाॅक्टरांचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲप्लीकेशनवरून युजर आयडी व पासवर्ड दिला जाणार आहे. त्यानंतर त्यावर हे प्रमाणपत्र अपलोड करता येणार आहे.

लर्निंग लायसन्स ऑनलाईन

लायसन्स काढताना एजंटांकडून होणारी लूट आणि आरटीओ कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. याशिवाय एजंटांकडून लूट होत होती. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरूकेली. त्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक ऑनलाईन पद्धतीने लर्निंग लायसन्स काढण्यात आली आहेत.

किती वयापर्यंत मिळते लायसन्स

वाहन चालविण्याचा परवाना काढताना वाहनधारकाचे किमान वय १६ ( विना गिअर वाहन), तर १८ वर्षे गिअरसहीत वाहन) त्यांनतर कितीही वय असले तरी चालते. मात्र, तो वाहनधारक वाहन चालविण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणित असला पाहिजे. त्याचे हे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने जोडावे लागणार आहे. तरच नवीन लायसन्स व नूतनीकरण होणार आहे.

एका डाॅक्टरला वीस प्रमाणपत्रे जारी करता येणार

लायसन्स काढताना आयुर्वेदिक, होमिओपॅथी या डाॅक्टरांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात होते. यावर आक्षेप घेतल्यानंतर आता एमबीबीएस डाॅक्टरांचेच प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात आहे. नव्या नियमानुसार डाॅक्टरांना केवळ २० जणांनाच हे प्रमाणपत्र देण्याची मुभा दिली आहे. हे प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहे.

कोट

चाळीशीनंतर लायसन्स काढताना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यकच आहे. आता त्याचे स्वरूप बदलले आहे. ॲपद्वारे हे वैद्यकीय प्रमाणपत्र एमबीबीएस डाॅक्टरांकडून घेणे बंधनकारक आहे. याशिवाय ऑनलाईन पद्धतीने सादर करणेही गरजेचे आहे. त्यासाठी युजर आयडी व पासवर्ड अर्जदाराला दिला जाणार आहे.

- रोहित काटकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर