शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘एनएसएस’ने केली लाखमोलाची सेवा

By admin | Updated: November 10, 2014 00:42 IST

शिवाजी विद्यापीठ : पाच वर्षांत तब्बल १८ कोटींची कामे

संतोष मिठारी -कोल्हापूर -महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्त्व विकास साधण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेने (एनएसएस) शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात प्रबोधनासह पायाभूत सुविधांमध्ये लाखमोलाची कामे करून ग्रामीण भागाच्या विकासाला हातभार लावला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत ‘एनएसएस’द्वारे गेल्या पाच वर्षांत १८ कोटी रुपयांची कामे केली आहेत.स्वच्छता, एचआयडी-एड्सबाबत प्रबोधन, मानवाधिकार, ग्राहकांचे हक्क असे विविध विषय घेऊन ‘एनएसएस’ शहरासह ग्रामीण भागात पोहोचली. शासनाला विविध योजना राबविण्यासाठी आवश्यक असणारे सर्व्हेदेखील ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांनी केले; शिवाय श्रमदान संस्कार शिबिरे घेतली. त्याच्या आधारे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील ग्रामीण भागांत २००९-१० ते २०१३-१४ या पाच वर्षांत एकूण १७ कोटी ८५ लाख ९६ हजार ५७९ रुपयांची कामे केली आहेत. त्यात डोंगर, घाटमाथ्यावर १ लाख १६१ समतोल चरी आणि ६४२ बंधाऱ्यांच्या माध्यमातून जलसंवर्धनाचे काम देखील आहे. चिखलांनी माखलेल्या पाणंदीमधील २ लाख ६८ हजार ५०० मीटरचे सुमारे १३ कोटी ४२ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे रस्ते साकारले आहेत.७ हजार १६५ शौचखड्डे तयार करून स्वच्छतेचा संदेश देत रोगराईला आळा घालण्याचे काम केले; शिवाय ५ लाख ७७ वृक्षांचे रोपण आणि १४ लाख १३ हजार बीजरोपणाचे काम करून पर्यावरण संवर्धनाला मदत केली आहे. विविध महाविद्यालयांमध्ये जयंती, उत्सवाचे निमित्त साधत शिबिरांद्वारे २७ हजार १७६ रक्तपिशव्यांचे संकलन करून रक्तदान चळवळीला बळ दिले आहे. निव्वळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर अशा पद्धतीने ग्रामीण विकासाला हातभार लावून महात्मा गांधीजींनी दिलेल्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाला मूर्त स्वरूप देण्याचे प्रशंसनीय काम केले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतून देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील परिस्थितीचे ज्ञान मिळते एवढे निश्चित!देशात पावणेचार कोटी स्वयंसेवकयुवा व खेळ प्राधिकरणाने १९६९ मध्ये महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात केली. सुरुवातीला देशांतील ३७ विद्यापीठांमधील ४० हजार विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते. आज देशात ३ कोटी ७५ लाखांहून अधिक ‘एनएसएस’चे स्वयंसेवक कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठातील अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यापीठ संलग्नित १७२ महाविद्यालयांत २३ हजार स्वयंसेवक आहेत.वृक्षसंवर्धन, जलसंधारणाचे काम वाढविणारप्रबोधनासह विद्यापीठ कार्यक्षेत्रात जी कामे झाली, ती विशेष श्रमसंस्कार शिबिर आणि प्रत्येक महाविद्यालयाला दोन वर्षे एक गाव दत्तक देऊन केली आहेत. त्याचा चांगला परिणाम झाला. यापुढे ‘एनएसएस’द्वारे विद्यापीठ वृक्षसंवर्धन, जलसंधारणाचे काम अधिक व्यापक करणार आहे.- डॉ. डी. के. गायकवाड, संचालक, शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ