शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

भगदाडाची मालिका सुरूच

By admin | Updated: January 21, 2015 00:10 IST

रंकाळ्याची अखेरची घटका : वर्षात तिसऱ्यांदा संरक्षक भिंत कोसळली

कोल्हापूर : प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेला व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आपल्या अखेरच्या घटका मोजत असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडील तटबंदीला काल, सोमवारी मध्यरात्री पुन्हा एक भगदाड पडले. वर्षभरात तिसऱ्यांदा भगदाड पडण्याचा प्रकार घडला. मात्र, महापालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने रंकाळाप्रेमींत संतापाची लाट पसरली असून हिंदू युवा प्रतिष्ठानने आंदोलनाचा इशारा दिला आहे.दिवसेंदिवस रंकाळ्याची तटबंदी धोकादायक बनत असताना महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. निखळणारे दगड काढणे, पडलेल्या तटबंदीची दुरुस्ती करणे, नारळ्याच्या फांद्यांपासून बचाव करण्यासाठी चर मारून आरसीसी भिंत उभारण्याच्या फक्त वल्गनाच लोकप्रतिनिधींकडून सुरु आहेत. प्रत्यक्षात कृती शून्य असल्याने प्रदूषणासह पायाभूत सुविधांच्या दुर्लक्षामुळे रंकाळ्याच्या मरणकळा वाढतच आहेत. आठ महिन्यांपूर्वी रंकाळ्याच्या कोसळलेल्या तटबंदीचे काम पैशांअभावी रेंगाळले. त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांत पुन्हा तब्बल ४० फुटांपेक्षा अधिक तटबंदी कोसळली. ढासळणाऱ्या तटबंदीवर कायमचा उपाय काढण्यासाठी महापालिकेत स्थायी समिती व महासभेत फक्त चर्चा झाल्या. प्रत्यक्षात एक रुपयाचीही अद्याप तरतूद झालेली नाही. यामुळे अगोदरच मरणासन्न झालेल्या रंकाळ्याची तटबंदीही नाहीसी होण्याच्या मार्गावर आहे. पश्चिमेकडे दुरुस्ती सुरू असलेल्या तटबंदी शेजारील मोठा भाग पाण्यात कोसळला. त्यामुळे आता पांढऱ्या घाटापर्यंत तटबंदीचे दगड कोसळण्याची दाट आहे. प्रदूषित पाणी तसेच तटबंदीजवळ असलेल्या नारळाची झाडे व भुसभुशीत जमीन यामुळेच संपूर्ण तटबंदी धोकादायक बनली आहे. उद्यानाकडील बाजूने तटबंदीचा भाग दीड ते दोन फुटांनी खचू लागला आहे. अनेक ठिकाणी तटबंदीही वेडी-वाकडी झाली आहे. एकमेकांपासून सुटत असलेले दगड काढून तटबंदी भक्कम करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, महापालिका प्रशासन व पदाधिकारी फक्त गप्पा व घोेषणाबाजीत रंगले आहेत.प्रदूषणाचा धोकारंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून महापालिकेला ६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला. गेली साडेचार वर्षे ही योजना रखडली. रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका येथील ड्रेनेजसाठी पाईपलाईन पूर्ण होऊनही सांडपाणी पूर्ण क्षमतेने वहन होत नाही. परिणामी मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळेच रंकाळ्याचे दुखणे वाढत आहे. दूषित पाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्यावर तेलकट तवंग साचला आहे. सांडपाण्याचे दुखणेशाम सोसायटी व साने गुरुजी वसाहतीतून आलेले सांडपाणी रंकाळ्यात मिसळते. केंदाळ समूळ नष्ट करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून विव्हिल किडे सोडण्यात आले. पण जलपर्णी कमी झाल्या नाहीत. आता मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे केंदाळाचे दुखणे पुन्हा वर काढत आहे.उपोषणाचा इशारातटबंदीचा मोठा भाग कोसळून चोवीस तास उलटले तरी महापालिका प्रशासनातील एकाही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीने त्याची दाद घेतलेली नाही. महापालिका प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास १ फेबु्रवारीपासून ‘बेमुदत उपोेषण’ करणार असल्याचा इशारा हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी दिला आहे.निव्वळ फार्सरंकाळा तलाव संवर्धनाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी महापालिकेची खास महासभाही झाली. तीनवेळा ‘एक दिवस रंकाळ्यासाठी’ हा उपक्रमही राबविला गेला. मात्र, रंकाळा प्रदूषणप्रश्नी प्रशासन ढिम्मच आहे. संरक्षक कठड्याची पडझड व सांडपाण्यामुळे रंकाळ्याला अवकळा आली आहे. दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे.उपायांची गरज ढासळलेल्या तटबंदीची बांधणी करणे तसेच मजबुतीकरणझाडांच्या मुळापासून असणारा धोका कमी करणे. संपूर्ण पाणी उपसून गाळ काढणे.अतिरिक्त झालेले पाणी बाहेर जाण्याची सोय करणे.तटबंदीचे वयोमान संपल्याने मजबुतीकरणाची गरज.नैसर्गिक पुनर्भरणासाठी धरण सुरक्षा संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेणे.तत्काळ निधीची उपलब्धता करून कामास सुरुवात करणे.