कोल्हापूर : शहराचे वैभव समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना आता श्वसनाच्या विकाराला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर धुळीचे लोटांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याला वाली कोण? अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे.गेल्या पाच वर्षांपासून रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका (तांबट कमान) या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता प्रथम ड्रेनेजसाठी खोदण्यात आला. त्यानंतर सुमारे अडीच ते तीन वर्षे ड्रेनेजच्या कामासाठी गेले; पण, रस्ता केला नाही. केवळ मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली. दरम्यान, सहा महिन्यांपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला; पण त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. यावरून वाहनचालकांना कसरत करीत जावे लागते. त्याचबरोबर धुळीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. दिवसभर नागरिकांना दारे बंद करून राहावे लागते. तसेच व्यावसायिकांना तोंडाला कापड लावून व्यवसाय करावे लागत आहेत. या रस्त्यासंदर्भात महापालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवकांना सातत्याने सांगूनही त्यांच्याकडून डोळेझाक होत आहे. या मार्गांवर टाकण्यात आलेल्या ड्रेनेजच्या पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.वारंवार सांगूनही सुधारणा होत नाही. मोर्चा काढून, निवेदने देऊन कंटाळलो आहे. महापालिकेला कधी जाग येणार आहे?- वसंत पाटील, नागरिकधुळीमुळे आरोग्याच्या साथी उद्भवत आहेत. तसेच लहान मुले सतत आजारी पडत आहेत. यातून कधी सुटका होणार? - यशवंत मिरजकर, नागरिकया रस्त्याचे काम खूप वर्षांपासून प्रलंबित असून, अनेकवेळा मोर्चा, आंदोलने करून देखील या रस्त्याकडे जाणीवपूर्वक प्रशासनाची डोळेझाक झाली होती. आता महापालिकेने रस्ता दुरूस्तीचे गाजर दाखवून नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. - अमोल टिकेकर, व्यावसायिककोणत्याही स्थितीत हा रस्ता झालाच पाहिजे, या मतावर ठाम आहे.- खंडेराव मोहिते, नागरिकअगोदरच मैलायुक्त पाण्याच्या वासामुळे हैराण झालो आहे. त्यातच या रस्त्याची धूळ खावी लागते आहे.- उमेश जाधव, नागरिक
बुलडाणा पोलीस दल विभागात द्वितीय
By admin | Updated: November 20, 2014 23:55 IST