शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक

By admin | Updated: September 1, 2014 23:55 IST

आरीफ शहा : उत्पादन वाढीसाठी जुन्या बागांचे पुनरूज्जीवन गरजेचे

जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर आंबा कलमांची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न जरूर करावा. मात्र, दर्जा राखण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी जुन्या बागांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. एकूणच आंबा उत्पादन घेताना व्यावसायिक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी आरीफ शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शासनाने आंबा लागवडीसाठी योजना जाहीर केल्यामुळे त्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांनी उत्पादित आंब्याचे ग्रेडिंग करणे गरजेचे आहे. आंब्याची वर्गवारी करून एक्स्पोर्ट, स्थानिक मार्केटसाठी व कॅनिंगसाठी आंबा बाजूला काढला तर शेतकऱ्याला नक्कीच अधिक पैसे मिळू शकतात. शेतकऱ्यांनी आंब्याकडे भावनिकदृष्ट्या न पाहता व्यावसायिक दृष्टीकोनातून लक्ष केंद्रित करावे, असेही शहा यांनी सांगितले.इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून जुन्या बागांचे पुनरूज्जीवन करणे गरजेचे आहे. वेळोवेळी शास्त्रोक्त पध्दतीने छाटणी करणे गरजेचे आहे. ईस्त्राईलचे हेक्टरी २१ टन उत्पादन आहे. त्यानुसार उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. एमआरजीएसअंतर्गत असलेली जॉबकार्डची अट शेतकऱ्यांना जाचक ठरत आहे. सर्व मजूर व शेतकरी यांना जॉबकार्ड अनिवार्य आहे, असे शहा यांनी सांगितले. पुणे - मुंबईस्थित नोकरदार मंडळीना जॉबकार्ड मिळत नाही. परंतु जॉबकार्ड असणाऱ्यांसाठी ते भरण्याकरिता ग्राम रोजगार सेवक नेमले आहेत. त्यामुळे दर आठवड्याला मजुरीची रक्कम जॉबकार्डधारकाच्या खात्यात जमा होते. रोजगार हमी योजनेंतर्गत ४६ हजार रूपये मिळत होते. मात्र, एमआरजीएसअंतर्गत १ लाख १० हजार इतके अनुदान मिळते. शिवाय तीन वर्षे अनुदानासाठी थांबण्याची गरज नाही. या योजनेतील काही त्रुटी वगळता निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे शहा यांनी सांगितले.स्थानिक शेतकऱ्यांकडून परदेशात विक्रीसाठी थेट आंबा पाठवणाऱ्यांची संख्या अल्प आहे. परंतु मुंबईतील व्यापाऱ्यांकडूनच आंबा परदेशात पाठवला जातो. आंब्यामध्ये किडीचे अंश सापडल्याचे कारण देत परदेशात यावर्षी आंबा नाकारला. वास्तविक कीटकनाशकांसाठी जी औषधे वापरली जातात, त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची कारणे पुढे करण्यात येतात. त्याऐवजी जर संबंधित औषधांवरच बंदी आणली, तर त्याचा वापर शेतकऱ्यांकडून केला जाणार नाही. बहुतांश शेतकरी मुंबई व पुणे बाजारपेठांवर अवलंबून राहतात. त्याऐवजी दिल्ली, नागपूर तसेच अन्य देशांतर्गत बाजारपेठा विकसित होणे गरजेचे आहे. एकूणच शेतकऱ्यांनी संघटित होऊन समस्यांकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.यावर्षी पाऊस लांबल्यामुळे भातशेती लागवड प्रक्रिया लांबली. त्यामुळे यावर्षी उत्पादनावर निश्चितच परिणाम होणार आहे. लागवडीपूर्वी लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. परंतु साथ कीटकनाशकामुळे आटोक्यात आणली. कीड सर्वेक्षणासाठी शासनातर्फे सहा महिने पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दर आठवड्याला आॅनलाईन रिपोर्ट पाठविला जातो. दिल्लीतील कार्यालयातून संबंधित रिपोर्ट पाहून शास्त्रज्ञांकडून कीड रोगाची पातळी पाहून सल्ला दिला जातो. त्यानुसार कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे किंवा प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन कीड प्रतिबंध, लागवड तंत्र विषयक मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांनी विशेषत: नवीन पिढीने जागृत राहून अत्याधुनिक तंत्राचा अवलंब करण्याची गरज असल्याचे शहा यांनी सांगितले.- मेहरून नाकाडेकोरडवाहू शेती अभियानांतर्गत तीन वर्षांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. पाणलोटअंतर्गत शेती तसेच हायब्रीड जातीच्या वापरातून कमी जागेत अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीकोनातून रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे, संगमेश्वरातील देवडे, तर लांजातील विवली ही गावे ‘मॉडेल’ गाव म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. - आरीफ शहा